निवडणुकीच्या तोंडावर मिझोरमच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली, 28ला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 02:40 PM2018-11-10T14:40:13+5:302018-11-10T14:43:40+5:30

निवडणूक आयोगानं मिझोरमचे मुख्य निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

mizoram chief election officer sb shashank to be removed | निवडणुकीच्या तोंडावर मिझोरमच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली, 28ला मतदान

निवडणुकीच्या तोंडावर मिझोरमच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली, 28ला मतदान

Next
ठळक मुद्देमिझोरमचे मुख्य निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्याचा निर्णय घेतला 40 जागा असलेल्या मिझोरम विधानसभेसाठी या महिन्याच्या 28 तारखेला मतदान होणार मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी मुख्य सचिवांकडे नव्या पॅनलची मागणीत्रिपुरातील शरणार्थी ब्रू समुदायातील लोकांना मिझोरमच्या सीमेमध्ये मतदान करता येणार

ऐझॉल- निवडणूक आयोगानं मिझोरमचे मुख्य निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मिझोरममध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शशांक यांना हटवण्याची मागणी होत होती. राजधानी ऐझॉलसह अनेक शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी शशांक यांना हटवण्यासाठी निदर्शनंही केली होती. 40 जागा असलेल्या मिझोरम विधानसभेसाठी या महिन्याच्या 28 तारखेला मतदान होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी जोर धरत असतानाच निवडणूक आयोगाची समिती मिझोरममध्ये दाखल झाली होती. त्यांच्या अहवालानंतर निवडणूक अधिकाऱ्याला बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच मिझोरमसाठी नवीन मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी मुख्य सचिवांकडे नव्या पॅनलची मागणीही केली आहे. मिझोरमच्या सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्यासाठी त्रिपुरातील शरणार्थी ब्रू समुदायातील लोकांना मिझोरमच्या सीमेमध्ये मतदान करण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगानं दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. निवडणूक आयोगानं राज्याचे प्रधान सचिव(गृह)ललनुनमाविया चुआऊंगो यांनाही हटवलं आहे. त्यानंतरच शशांक यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती. चुआऊंगो हे निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याची शशांक यांनी तक्रार केली होती.

मुख्यमंत्री ललथनहवला यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातून त्यांनी मुख्य निवडणूक अधिका-यांची तक्रार केली होती. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांवरच लोकांचा विश्वास उडाला आहे. 2018ची विधानसभा निवडणूक सुरळीत होण्यासाठी एस. बी. शशांक यांना तात्काळ पदावरून हटवण्याची गरज असल्याचं मत मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रातून मांडलं होतं. 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेशमध्ये मतदान होणार आहे. राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांतही निवडणुका होत आहेत. पाच राज्यांतील मतदानाची मोजणी 11 डिसेंबरला होणार आहे. 

Web Title: mizoram chief election officer sb shashank to be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.