"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 05:07 PM2024-11-27T17:07:46+5:302024-11-27T17:09:20+5:30

Mizoram CM Lalduhoma : मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी विभागांच्या चौकशीसाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सरकारी विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर करतील.

Mizoram Chief Minister Lalduhoma vows to remove non-performing employees | "...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Mizoram CM Lalduhoma : मिझोरम सरकारने कामात टाळाटाळ करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मंगळवारी शिक्षण विभागाची आढावा बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी नीट काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी विभागांच्या चौकशीसाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सरकारी विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर करतील.

सरकारी कर्मचाऱ्यांची वाढती बेपर्वाई लक्षात घेऊन मिझोरम सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. जो कर्मचारी आपले काम नीट करत नाही, त्याला सेवेतून मुक्त केले जाईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच, किती कर्मचारी आपली जबाबदारी चोख बजावत आहेत? याचा शोध घेण्यासाठी शासन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणार आहे. त्याचबरोबर सरकारने आढावा घेण्यासाठी समित्या तयार करण्यास सुरुवात केली आहे.

चौकशीसाठी अनेक समित्या स्थापन
जे आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाहीत, त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतील, असे मंगळवारी आयझॉलमध्ये झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले की, योग्य आणि कुशल कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि निष्क्रिय कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे.

अयोग्य कर्मचाऱ्यांना सरकार काढून टाकणार
अयोग्य कर्मचारी यापुढे नोकरीसाठी योग्य नाहीत म्हणून त्यांना काढून टाकले पाहिजे. आमचे सरकार उत्तम दर्जाच्या सेवा देणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले. तसेच, सरकार राज्यभरात सर्व प्रकल्पांची योग्य आणि प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी पावले उचलत आहे. राज्य प्रकल्प संनियंत्रण समितीमार्फत सर्व प्रकल्पांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. समितीने आतापर्यंत जवळपास 40 प्रकल्पांचा आढावा घेतला आहे, असेही मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी सांगितले.

Web Title: Mizoram Chief Minister Lalduhoma vows to remove non-performing employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.