Video - मुलीच्या गैरवर्तवणुकीमुळे मुख्यमंत्र्यांना मागावी लागली जाहीर माफी, म्हणाले SORRY
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 12:52 PM2022-08-22T12:52:51+5:302022-08-22T12:59:59+5:30
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलीच्या गैरवर्तवणुकीवरुन जाहीर माफी मागितली आहे. त्यांच्या मुलीने एका डॉक्टराला मारहाण केली होती.
मुलीच्या चुकीची वडिलांना माफी मागावी लागली आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी आपल्या मुलीच्या गैरवर्तवणुकीवरुन जाहीर माफी मागितली आहे. त्यांच्या मुलीने एका डॉक्टराला मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या घटनेवरुन टीकेची झोड उठली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर जाहीर माफी मागितली.
आपल्या मुलीच्या वागणुकीचं कोणत्याही प्रकार समर्थन केलं जाऊच शकत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेप्रकरणी डॉक्टरांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शनिवारी जवळपास 800 पेक्षा जास्त डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी निदर्शने दिली होती. त्यानंतर रविवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मिझोराम संघटनेने काळी पट्टी बांधून या घटनेवर निषेध व्यक्त केला.
#WATCH | Mizoram CM #Zoramthanga's Daughter 'Hits' Doctor, Father Apologises
— Subodh Kumar (@kumarsubodh_) August 21, 2022
Mizoram CM Zoramthanga tendered a public apology on his official Instagram handle for his daughter’s “misbehaviour” with a doctor earlier in the week, & said that he would, in no way,justify her conduct pic.twitter.com/auTqqAdFzn
मुख्यमंत्र्यांची मुलगी छांगते यांनी एका डॉक्टरावर हल्ला केला. छांगते या अचानक डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी डॉक्टरने अपॉईंटमेंट घेऊन यायला हवं होतं, असं सांगितलं. त्यानंतर संतापलेल्या छांगतेने डॉक्टरावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घटनेंतर आता मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे. तसेच संबंधित डॉक्टराची भेट घेऊन आपण माफी मागितली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
डॉक्टरासोबत माझ्या मुलीने केलेल्या गैरवर्तवणुकीवरुन तिचा बचाव करण्यासाठी आम्ही काहीच करणार नाही. आम्ही जनता आणि डॉक्टरची माफी मागतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांआधी छांगतेचा भाऊ रामथानसियामां यांनी देखील सोशल मीडियावर माफी मागितली होती. मानसिक तणावात असल्याने आपल्या बहिणीचा ताबा सुटला, असं त्याने सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.