नेता असावा तर असा! मिझोरमच्या कोरोनाग्रस्त मंत्र्यांची अनोखी सेवा; रुग्णालयात पुसली लादी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 03:35 PM2021-05-15T15:35:22+5:302021-05-15T15:46:27+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाची लागण झालेल्या मंत्र्यांनी रुग्णालयात सेवा केली असून रुग्णालयात लादी साफ करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.
नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान अनेक नेते मंडळींनी देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर मिझोरममधील एका मंत्र्याचा फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या मंत्र्यांनी रुग्णालयात सेवा केली असून रुग्णालयात लादी साफ करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.
मिझोरमचे ऊर्जामंत्री आर. लालझिरलियाना (R Lalzirliana) हे कोरोना पॉझिटिव्ह असूनही रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये सेवा करत आहेत. लालझिरलियाना यांना 11 मे रोजी कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आधी ते दोघेही होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र त्यानंतर ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने लालझिरलियाना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लालझिरलियाना रुग्णालयात सेवा करत असून लादी पुसताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर कमी वेळात खूप व्हायरल झाला.
If every citizen is responsible this type of situation wouldn't have happened in delhi. Still I remember one lady how she fought with police for fining not wearing mask my goodness we cannot even forget. This type of citizens only responsible for spreading the virus 2 wave
— SURESHBABU (@GVSURESHBABU) May 15, 2021
"आम्ही ज्या वॉर्डमध्ये आहोत, तो वॉर्ड खराब होता. मी साफसफाई करण्यासाठी फोन करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याला बोलावलं होतं. मात्र खूप वेळ झाला पण कोणीच आलं नाही. अशातच मी आणखी वाट पाहत बसण्यापेक्षा स्वत: साफसफाई करायला सुरुवात केली. हे स्वच्छतेचं काम करून मला सफाई कर्मचारी अथवा प्रशासनाला खालीपणा दाखवण्याचा किंवा त्यांचा अपमान करण्याचा उद्देश नाही तर हे एक सामान्य काम आहे. मी माझ्या घरी देखील साफसफाई करतो. अशीच इथेही करतो" अशी माहिती लालझिरलियाना यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. आपल्या कृतीतून त्यांनी मनं जिंकली असून त्यांचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
superb example..wish others could follow
— Because world is in me (@MoushumiMaiti) May 15, 2021