नवख्या झेडपीएम पक्षाला पहिल्याच निवडणुकीत बहुमत; सत्ताधाऱ्यांना दिला माेठा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 07:31 AM2023-12-05T07:31:06+5:302023-12-05T07:31:27+5:30
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना धक्का; अवघ्या पाच वर्षे वयाच्या झेडपीएम पक्षाचा पराक्रम
आयझॉल : विधानसभा निवडणुकीत मिझोराममधील सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटसाठी अनेक निकाल धक्कादायक ठरले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह ११ मंत्र्यांपैकी ९ जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुख्यमंत्री झाेरमथांगा आयझॉल पूर्व या मतदारसंघात पराभूत झाले आहेत.
उपमुख्यमंत्री तानलुइया यांच्यासह आरोग्य आणि कुटु्ंब कल्याणमंंत्री आर. लालथंगलियाना ऊर्जामंत्री आर. लालजीरलियाना आणि कृषिमंत्री सी. लालरिनसांगा, के. लालरिनलियाना, लालरुतकिमा, लालरिनावमा, टी. जे. लालनुनत्लुआंगा, लालचंदामा राल्ते, रॉबर्ट रोमाविया रोयते दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
दारूण पराभवानंतर मुख्यमंत्री झाेरमथांगा यांनी राज्यपाल हरीबाबू कंभंपाती यांच्याकडे राजीनामा साेपविला. तर पक्षाच्या सर्व नवनियुक्त सदस्यांची मंगळवारी बैठक घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असे झेडपीएमतर्फे सांगण्यात आले.
३ महिला आमदार
४० सदस्यांच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या केवळ ३ आहे. बहुमत मिळविणाऱ्या झेडपीएम पक्षाच्या बॅरील व्हॅनेहसांगी, लालरीनपुई आणि एमएनएफच्या प्राेव्हा चाक्मा यांचा विजय झाला. यावेळी १७४ उमेदवारांपैकी केवळ १६ उमेदवार महिला हाेत्या. मावळत्या विधानसभेत एकही महिला आमदार नव्हत्या.
६ पक्षांना केले एकत्र
लालदुहाेमा यांनी मिझाेराम पीपल्स काॅन्फरन्स, झाेरम नॅशनलिस्टिक पार्टी, झाेरम एक्साेडस मूव्हमेंट, झाेरम डिसेंट्रलायझेशन फ्रंट, झाेरम रिफाॅर्मेशन फ्रंट आणि मिझाेराम पीपल्स पार्टी या पक्षांना एकत्र आणले. २०१८मध्ये अधिकृतरीत्या झेडपीएम आघाडीची स्थापना झाली. मात्र, आयाेगाकडे नाेंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागली.
असा साकारला विजय...
पक्षाने तळागाळात जाऊन प्रचार केला. स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. भाजप किंवा काॅंग्रेससाेबत आघाडी करणार नसल्याचे लालदुहाेमा यांनी स्पष्ट केले हाेते. पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू, असे त्यांनी म्हटले हाेते. राज्यातील जनतेने याच मुद्द्यांना स्वीकारत त्यांच्या पारड्यात मतांचे दान दिले. पक्षाने तळागाळात जाऊन प्रचार केला. स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. भाजप किंवा काॅंग्रेससाेबत आघाडी करणार नसल्याचे लालदुहाेमा यांनी स्पष्ट केले हाेते.