कडक सॅल्यूट! ...अन् गर्भवती महिलेसाठी आमदार ठरले देवदूत, डॉक्टरांच्या अनुपस्थितीत केली प्रसूती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 02:39 PM2020-08-12T14:39:49+5:302020-08-12T14:49:20+5:30
एका आमदाराने वेळेत उपचार करून गर्भवती महिलेचा जीव वाचवला आहे.
एजवाल : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. लोकांच्या मदतीसाठी अनेक जण पुढाकार घेत आहे. अशीच एक घटना मिझोरममध्ये घडली आहे. एका गर्भवती महिलेसाठी आमदार देवदूत ठरले आहेत. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत त्यांनी महिलेची प्रसूती केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे महिला आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. मिझोरमच्या चंपाई जिल्ह्यात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका आमदाराने वेळेत उपचार करून गर्भवती महिलेचा जीव वाचवला आहे. झेडआर थियामसंगमा (ZR Thiamsanga) असं आमदाराचं नाव आहे. चंपाई जिल्ह्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने थियामसंगमा यांनी एका महिलेची प्रसूती केली. आमदार भूकंपग्रस्त भागाचा दौरा करत होते. त्याच दरम्यान या भागात डॉक्टर उपलब्ध नसल्याने एका महिलेच्या प्रसूतीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावेळी त्यांनी महिलेची प्रसूती केली.
टवाळखोरांचा उच्छाद! स्वत:च्या मेहनतीने अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीवhttps://t.co/7eLqQXxe18#SudikshaBhati
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2020
थियामसंगमा हे प्रसूती व स्त्री-रोगतज्ज्ञ आहेत. ते अनेकदा दुर्गम भागात भेटीला जाताना स्वत:जवळ स्टेथोस्कोपही ठेवतात. या भागात भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार म्यानमारच्या सीमेजवळील त्यांचा मतदारसंघ असलेल्या चंपाईमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत यांनाही धोकाhttps://t.co/0MBlRi5ZYv#SakshiMaharaj#BJP#Pakistan
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2020
रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आरोग्याच्या समस्येमुळे रजेवर असल्याचं देखील समजलं. तसेच महिला दूर असलेल्या रुग्णालयात जाण्यासाठी प्रवास करू शकत नव्हती. तिला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. अशावेळी आमदारांनी परिस्थितीचं गांभीर्य पाहून महिलेची सिझेरियन प्रसूती केली. 'मला त्या महिलेच्या प्रकृतीची माहिती कळताच मी ताबडतोब रुग्णालयात दाखल झालो आणि महिलेची शस्त्रक्रिया केली' असं थियामसंगमा यांनी म्हटलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोना लसी संदर्भातील 'ही' वेबसाईट नेमकी कशी आहे?, जाणून घ्याhttps://t.co/7CFxrfrLdA#coronavirus#CoronaUpdates#CoronavirusVaccine#CoronaVaccine#RussianVaccine#SputnikV
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Corona Vacine : 20 वर्षांपासूनच्या शोधाची कमाल; रशियाकडून SputnikV वेबसाईट लाँच
भयंकर! धावत्या बसने अचानक घेतला पेट; 5 जणांचा होरपळून मृत्यू, 27 जण जखमी
"ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र
"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी
बंगळुरू पेटलं! शहरात कलम 144 लागू; पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी 110 जणांना अटक
कोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो