CCTV बंद करायचे, तुरुंगात पतीसोबत वेळ घालवायची मुख्तार अन्सारींची सून; असा झाला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 11:45 AM2023-03-06T11:45:58+5:302023-03-06T11:46:11+5:30
काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी आणि सून तुरुंगात भेटत असल्याचा खुलासा झाला होता. या प्रकरणी एसआयटीने केलेल्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे.
काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी आणि सून तुरुंगात भेटत असल्याचा खुलासा झाला होता. या प्रकरणी एसआयटीने केलेल्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. अब्बास अन्सारीची पत्नी रोज तुरुंगात पतीला भेटायला जात होती. यावेळी तुरुंगातील सर्व सीसीटीव्ही बंद केले जायचे. दररोज दिवसभरातील ती ४ ते ५ तास तुरुंगात असायची.
एसआयटीने आता या प्रकरणी डेप्युटी जेलर आणि जेल वॉर्डरची चौकशी केली असून त्यात त्यांनी अनेक गुपिते उघड केली आहेत. त्याआधारे कारागृह अधीक्षक आणि जेलरला अटक करण्यात आली आहे.
अब्बास अन्सारीची पत्नी निखत बानो रोज चित्रकूट जेलमध्ये जात होत्या आणि पतीसोबत ४-५ तास जेलमध्ये थांबत होत्या. या संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चित्रकूट कारागृहात अचानक धाड टाकली. यावेळी तुरुंगाच्या बॅरेक्सऐवजी अब्बास अन्सारी हा त्याच्या पत्नीसह कारागृह अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी असलेल्या खोलीत आढळून आला होता.
नोटांच्या ढिगाऱ्याचं गूढ आलं समोर! स्मार्ट वॉचने भाजप आमदार पुत्राला तुरुंगात पाठवले
तुरुंगातील कर्मचाऱ्यांची एसआयटीने चौकशी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. अब्बास अन्सारीची पत्नी निकत बानो जेव्हा भेटायची तेव्हा विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी कारागृहात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले. यासोबतच निखत येण्यापूर्वी मुख्य गेटचा कॅमेराही बंद केला होता, असंही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान डेप्युटी जेलर आणि जेल वॉर्डरची ड्युटी गरजेनुसार लावली जायची आणि ते संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी घेत असत, असेही चौकशीदरम्यान समोर आले आहे, यावेळी ड्युटीवर असलेले अधिकारी कॅन्टीनपासून ते कारागृहाच्या मुख्य गेटपर्यंत सर्वत्र येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवून असायचे.