आमदार भोळे कडाडले : खड्डे बुजविले जात नाही, ७० टक्के लाईट बंद मग कामे करतात तरी काय? महापौर शहराचे मालक आहेत का...

By admin | Published: May 28, 2016 07:32 PM2016-05-28T19:32:05+5:302016-05-28T19:32:05+5:30

जळगाव : खड्डे बुजविण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च झाला पण जैसे थे परिस्थिती आहे. वारंवार सूचना देऊन महापौरांचे नाव सांगितले जाते...मग महापौर या शहराचे मालक आहेत काय? ते कर भरतात मग जनता भरत नाही का? असा सवाल आमदार सुरेश भोळे यांनी मनपात आयोजित बैठकीत शनिवारी केला. मान्सूनपूर्व कामांना गती द्या अन्यथा कारवाई करा असे आदेशही त्यांनी अधिकार्‍यांना यावेळी दिले.

MLA Bhole Kadale: Potholes are not wasted, 70% of the lights are closed and then what? Whether the mayor owns the city ... | आमदार भोळे कडाडले : खड्डे बुजविले जात नाही, ७० टक्के लाईट बंद मग कामे करतात तरी काय? महापौर शहराचे मालक आहेत का...

आमदार भोळे कडाडले : खड्डे बुजविले जात नाही, ७० टक्के लाईट बंद मग कामे करतात तरी काय? महापौर शहराचे मालक आहेत का...

Next
गाव : खड्डे बुजविण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च झाला पण जैसे थे परिस्थिती आहे. वारंवार सूचना देऊन महापौरांचे नाव सांगितले जाते...मग महापौर या शहराचे मालक आहेत काय? ते कर भरतात मग जनता भरत नाही का? असा सवाल आमदार सुरेश भोळे यांनी मनपात आयोजित बैठकीत शनिवारी केला. मान्सूनपूर्व कामांना गती द्या अन्यथा कारवाई करा असे आदेशही त्यांनी अधिकार्‍यांना यावेळी दिले.
महापालिकेत मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन आमदार सुरेश भोळे यांनी केले होते. यावेळी उपायुक्त प्रदीप जगताप, नगररचना साहाय्यक संचालक चंद्रकांत निकम, भाजपाचे गटनेते अश्विन सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस मनपातील सर्व अधिकारी वर्गाचीही उपस्थिती होती.
प्रभाग अधिकारी धारेवर
शहरात गल्ली बोळात वेस्ट मटेरियल पडलेले आहे. ते उचलले जात नाही. या विषयावर चर्चा सुरू असताना वेस्ट मटेरियल उचलण्यासाठी वाहन नसल्याचे प्रभाग अधिकार्‍यांनी सांगितले. बांधकाम विभागाचे शहरात १८ इंजिनिअर आहेत. त्याच्या भागात सर्वच कामांचे मिळून ५ वाहने आहेत. त्यातच डांबरप˜ीचे कामे सुरू असल्याने २ वाहने या कामांवर आहेत. त्यामुळे मटेरियल उचलले जात नसल्याचे यावेळी सांगण्यात आाले. असे असले तरी कामे सुरू असल्याचे सांगण्यात येताच प्रभाग अधिकारी खोटी माहिती देतात असा ठपका ठेवून आमदार भोळे संतापले. ज्या भागात ज्या नागरिकाचे मटेरियल पडले असेल त्यांना सोमवारपर्यंत नोटिसा बजावल्या जाव्यात. प्रभाग समित्यांमधील इंजिनिअर्सवर जबाबदारी निि›त करून त्यांच्याकडून आढावा घ्यावा कामे करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करा अशा कडक शब्दात त्यांनी प्रभाग समिती अधिकार्‍यांना ठणकावले.
तर भाड्याने डंपर लावा
शहरात नाले सफाईची कामे सुरू आहेत. आता केवळ ३० टक्के काम बाकी आहे, अशी माहिती आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी दिली. मात्र नाल्यातून काडलेला कचरा हा काठावरच पडून रहात असल्याने पावसाळ्यात तो पुन्हा नाल्यात जाऊन पाणी अडेल अशा तक्रारी नगरसेवक पृथ्वराज सोनवणे, विजय गेही, अश्विन सोनवणे यांनी केल्या. नाल्याच्या काठावरील ही घाण त्वरित उचलण्यासही डंपर कमी पडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या पद्धतीने जेसीबी भाड्याने लावले तसे डंपर लावून ते मटेरियल उचलले जावे.

Web Title: MLA Bhole Kadale: Potholes are not wasted, 70% of the lights are closed and then what? Whether the mayor owns the city ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.