Diya Kumari : "भाजपाचं सरकार येणार आहे, 4 दिवसांत जाल..."; दिया कुमारींचा दबंग Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:38 PM2023-12-11T12:38:19+5:302023-12-11T12:50:59+5:30
Diya Kumari : जयपूरच्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार दिया कुमारी यांचा एक दबंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या दिया कुमारी फुल एक्शन मोडमध्ये दिसत आहे. जयपूरच्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार दिया कुमारी यांचा एक दबंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भाजपा आमदार फोनवर पोलीस अधिकाऱ्यांवर निशाणा साधत आहेत.
"अशोक गेहलोत यांनी तुम्हाला आणलंय. चार दिवसांत भाजपाचं सरकार येणार आहे. तुम्हाला इथून हटवलं जाईल... अशा ठिकाणी जाल की कुठे गेलाय हे कळणारही नाही" असं दिया कुमारी यांनी पोलीस अधिकाऱ्यांना म्हटलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ जयपूरच्या झोटवाडा पोलीस ठाण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी झोटवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
वडिलांचा आरोप आहे की, त्यांची 8 वर्षांची मुलगी तिच्या 5 वर्षाच्या भावासोबत शाळेत जाते. स्कूल व्हॅन चालक अब्दुल मजीद गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीला धमकावत होता आणि बलात्कार करत होता. चालकासह त्याच्या काही मित्रांनीही अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीच्या वडिलांनी शाळेतून परतत असताना मुलीला एका वेगळ्या घरात नेऊन तिच्या लहान भावाला व्हॅनमध्ये कोंडून ठेवल्याचा आरोपही केला आहे.
This is one more BJP MLA, Diya Kumari showing arrogance in Police station.
— Amock (@Politics_2022_) December 10, 2023
Rajasthan will slowly become MLA centric & Police will watch their drama. Watch how they are chanting without any shame. pic.twitter.com/2HUkOPOrRL
पीडितेच्या कुटुंबीयांनी बाल संरक्षण आयोगाकडे न्याय मागितला आहे. आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या वडिलांची तक्रार पोलिसांकडे दिली. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी टाळाटाळ केली, मात्र त्यानंतर सामाजिक संघटनांच्या दबावानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या अनेक सामाजिक संघटनांनी शनिवारी रात्री झोटवाडा पोलीस ठाणे गाठलं.
यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच विद्याधर नगरच्या नवनिर्वाचित आमदार दिया कुमारी यांनीही पोलीस ठाणे गाठलं. भाजपा आमदार दिया कुमारी यांनी लोकांची भेट घेतली. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यानंतर सामूहिक बलात्कारातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.