माझ्या मनातही तोगडियांसारखी भीती, भाजपा-आरएसएसकडून माझ्या हत्येचा कट : जिग्नेश मेवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 02:33 PM2018-01-17T14:33:58+5:302018-01-17T14:47:26+5:30

'माझ्या जिवाला धोका असून भाजपा आणि आरएसएस माझा काटा काढू शकतात' अशी भीती गुजरातमधील आमदार आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केली आहे.

MLA jignesh mewani said that there is a threat to his life like praveen togadia and bjp rss want to kill him | माझ्या मनातही तोगडियांसारखी भीती, भाजपा-आरएसएसकडून माझ्या हत्येचा कट : जिग्नेश मेवाणी

माझ्या मनातही तोगडियांसारखी भीती, भाजपा-आरएसएसकडून माझ्या हत्येचा कट : जिग्नेश मेवाणी

Next

नवी दिल्ली: 'माझ्या जिवाला धोका असून भाजपा आणि आरएसएस माझा काटा काढू शकतात' अशी भीती गुजरातमधील आमदार आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केली आहे. 'माझ्या मनातही विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्याप्रमाणे भीती आहे. काही लोकं माझी हत्या करू शकतात, भाजपा आणि आरएसएसचे लोकं मला मारू शकतात. त्यांच्या मार्गातून माझा काटा ते काढू शकतात अशी माहिती मला मिळाली आहे' असं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जिग्नेश मेवाणींनी म्हटलं आहे.   
गुजरातच्या शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. काल एक व्यक्ती माझ्या घरात घुसला व माझं एन्काऊंटर करण्याचं षडयंत्र असल्याचं मला सांगितलं. 10 वर्षांपूर्वीची जुनी प्रकरणे उकरुन काढून मला त्यामध्ये मला गोवण्याचा डाव आहे. आयबीच्या माध्यमातून मला धमकावण्याचा प्रयत्न होतोय. मोदी सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप तोगडियांनी केला.
मागच्या काही काळापासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मी हिंदू एकतेसाठी प्रयत्न करत आहे आणि करत राहीन. मी मरणाला अजिबात घाबरत नाही असे प्रवीण तोगाडिया म्हणाले. या पत्रकार परिषदेदरम्यान भावून झालेल्या तोगाडिया यांना रडू कोसळले. 
त्यानंतर पाटीदार समाजाचे नेता हार्दिक पटेल यांनी तोगडियांची भेट घेतली. तोगडियांची भेट घेतल्यानंतर हार्दिक पटेलनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी आणि शहा हे प्रवीण तोगडियांविरोधात कट रचत आहेत असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने यावेळी केला.
'तोगडियांच्या विरोधात कट रचला जात आहे, हा कट दुसरं-तिसरं कुणी नाही तर खुद्द पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी रचला आहे. तोगडिया आणि आम्ही शेतक-यांच्या हिताचे मुद्दे उचलतो म्हणून आम्हाला लक्ष्य केलं जात आहे' असं पटेल यावेळी म्हणाले. 'विद्यमान भाजपा सरकार तोडगियांना त्रास देत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावरून तोगडियांना मोदी-शहा त्रास देत आहेत , सर्वांना माहीत आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा या कटामागे हात आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ तोगडिया यांच्या विरोधात आहे, हे आता लपून राहिलेले नाही' असं हार्दिक पटेल पुढे म्हणाले. 

Web Title: MLA jignesh mewani said that there is a threat to his life like praveen togadia and bjp rss want to kill him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.