आमदाराच्या कारला स्कॉर्पिओची जोरदार धडक; बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 09:13 AM2023-05-01T09:13:57+5:302023-05-01T09:33:11+5:30

आमदार मुकेश कुमार यादव हे डुमरामधील कैलाशपुरी येथील घरातून विधानसभा क्षेत्रात कामकाजानिमित्त जात होते

MLA's car hit by Scorpio; Unconscious in the hospital in patana MLA mukesh kumar yadav | आमदाराच्या कारला स्कॉर्पिओची जोरदार धडक; बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात

आमदाराच्या कारला स्कॉर्पिओची जोरदार धडक; बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात

googlenewsNext

पाटणा - बिहारच्या बाजपट्टी येथील तरुण नेते आणि राजद पक्षाचे आमदार मुकेश कुमार यादव यांच्या कारला रविवारी अपघात झाला. डुमरा जिल्ह्यातील विश्वनाथपूर येथील लालू यादव चौकात ही अपघाताची घटना घडली. मुकेश कुमार यांच्या स्कॉर्पिओ गाडीला दुसऱ्या एका स्कॉर्पिओ कारने धडक दिली. त्यामध्ये, आमदार महोदयांना गंभीर जखम झाली आहे. सुदैवाने स्कॉर्पिओ गाडी पलटी होता होता वाचली, त्यामुळे कारमधील इतर प्रवाशांना कुठलाही इजा झाली नाही.

आमदार मुकेश कुमार यादव हे डुमरामधील कैलाशपुरी येथील घरातून विधानसभा क्षेत्रात कामकाजानिमित्त जात होते. त्याचवेळेस, एनएच-२२ विश्वनाथपुर फोरलेनजवळ सोनबरसाच्या बाजुने येणाऱ्या स्कार्पिओने आमदार कुमार यांच्या गाडीला धडक दिली. या दुर्घटनेनंतर आमदार मुकेश कुमार हे बेशुद्ध पडले होते. त्यांच्या शरीरावर कुठेही जखम झाली नाही, पण अपघाताच्या धक्क्याने ते बेहोश पडले. त्यामुळे, त्यांना तात्काळ शहराच्या नाहर चौकातील अस्थीरोग विशेषज्ञ डॉ. अनिल कुमार सिंह यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

डॉ. अनिल कुमार यांनी आमदार महोदयांची तपासणी केली, त्यानंतर सीटी स्कॅन केल्यानंतर कुठलाहीही गंभीर जखम झाली नसल्याचे निष्पण्ण झाले. मात्र, तरीही निकटवर्तीयांच्या आग्रहास्तव आमदार मुकेश कुमार यांना पाटणा येथील आयजीआयएमएस येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डुमरा जिल्ह्यातील इतर आमदार, माजी खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेटीसाठी धाव घेतली. 

Web Title: MLA's car hit by Scorpio; Unconscious in the hospital in patana MLA mukesh kumar yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.