आपचे आमदार मोदींच्या ‘दारी’

By Admin | Published: June 27, 2016 04:30 AM2016-06-27T04:30:11+5:302016-06-27T04:30:11+5:30

सिसोदिया यांच्या नेतृत्वात ५२ आमदारांनी रविवारी सांकेतिक ‘शरणागती’ पत्करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली.

MLA's 'Dari' | आपचे आमदार मोदींच्या ‘दारी’

आपचे आमदार मोदींच्या ‘दारी’

googlenewsNext


नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वात ५२ आमदारांनी रविवारी सांकेतिक ‘शरणागती’ पत्करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी मोदींच्या ७ रेसकोर्स निवासस्थानापासून एक किमी अंतरावर अति सुरक्षित क्षेत्रात हा मार्च रोखत आमदारांना ताब्यात घेतले. आमदारांचा हा ‘हाय ड्रामा’राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला असून केंद्र आणि राज्य संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये सिसोदिया यांच्यासह सहा मंत्र्यांचाही समावेश होता. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल या आमदारांना रेसकोर्स मेट्रो स्थानकाजवळ ताब्यात घेण्यात आल्यानंतर संसद भवन मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. काही वेळानंतर सर्वांची सुटका करण्यात आली.
आम्ही आपचे सर्व आमदार एकजुटीने पंतप्रधानांकडे गेलो होतो. पंतप्रधानांना आम्हाला कारागृहात पाठविण्याचे राजकारण करायचे असल्यास आम्ही सर्वजण तुमच्याकडे येतो. आम्हाला सर्वांना कारागृहात पाठवा. दिल्ली पोलीस किमान बलात्काऱ्यांना तरी अटक करू शकतात, हे सांगण्यासाठी आम्ही गेलो होतो, पण आम्हाला ताब्यात घेऊन सोडण्यात आले, असे सिसोदिया यांनी म्हटले. तत्पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सकाळी आमदारांची बैठक बोलावली. विधानसभाध्यक्ष रामनिवास गोयल आणि उपाध्यक्ष राखी बिर्ला हेही या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर केजरीवाल टिष्ट्वटमध्ये म्हणाले, मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. ते ७ रेसकोर्स या पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन शरणागती पत्करतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>दिली सरकार-भाजपात का उडाली संघर्षाची ठिणगी?
दिल्लीच्या ७० सदस्यीय विधानसभेत आपचे ६७ आमदार आहेत. आपचे आमदार दिनेश मोहनिया यांना शनिवारी लैंगिक छळवणूक आणि लैंगिक अत्याचाराबद्दल पोलिसांनी अटक केली होती. त्यातच गाझीपूर मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी धमकी दिल्याची तक्रार दाखल केल्यामुळे संघर्षाची ठिणगी उडाली.
तुम्हाला आम्हाला अटक करण्याची आवड असल्यास अटक करा. आमदारांशी वैमनस्य असल्यास त्यांना अटक करा; मात्र दिल्लीच्या कामकाजाचा खोळंबा करू नका, दिल्लीच्या जनतेसाठी काम करा हे मोदीजींना सांगण्यासाठी मी गेलो होतो.
- मनीष सिसोदिया, उपमुख्यमंत्री, दिल्ली
दिल्लीच्या जनतेने आम आदमी पार्टीला जनादेश दिला आहे, मात्र केजरीवाल हे नाटकांमध्ये गुंतले आहेत. आपच्या आमदारांनी काढलेला मार्च म्हणजे ड्रामा होता.
- किरण रिजिजू,
केंद्रीय गृह राज्यमंत्री

Web Title: MLA's 'Dari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.