आमदाराच्या चालकाने पळवली अल्पवयीन मुलगी अपहरणाचा गुन्हा दाखल : लग्न करण्याचे दाखविले आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2016 12:07 AM2016-05-21T00:07:17+5:302016-05-21T00:07:17+5:30
जळगाव: आमदार सुरेश भोळे यांचा चालक असलेला पवन सोनार (रा.रामेश्वर कॉलनी) याने लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरुन पवनविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
ज गाव: आमदार सुरेश भोळे यांचा चालक असलेला पवन सोनार (रा.रामेश्वर कॉलनी) याने लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरुन पवनविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील एका कॉलनीत सुरक्षा रक्षक असलेल्या फिर्यादीची मुलगी सातवी पास झालेली आहे. सध्या तिचे शिक्षण थांबविण्यात आले होते. पवन सोनार हा आमदार भोळे यांच्या वाहनावर चालक असल्याने त्याचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे होते. यादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. ही बाब मुलीच्या आई-वडिलांच्या गुरुवारी लक्षात आली. त्यानंतर त्याला घरी बोलावून मुलीपासून लांब राहण्याचे सांगण्यात आले. त्यावर पवन हा त्याचा मित्र जयेश पाटील याला घेऊन दारू पिऊन घरी आला व मुलीच्या भावाला धमकी देऊन निघून गेला.रात्री झोपेतून गायब झाली मुलगीगुरुवारी रात्री सर्वजण झोपल्यानंतर शुक्रवारी पहाटे पावणे चार वाजता आई ही पाणी पिण्यासाठी उठली असता मुलगी जागेवर दिसली नाही. तिचा परिसरात तसेच रेल्वे स्टेशन व बसस्थानकावर शोध घेतला असता ती सापडली नाही. पवन सोनार यानेच फुस लावून मुलगी पळविल्याची खात्री झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.कोट..पवन सोनार हा पूर्वी चालक म्हणून कामाला होता.सध्या माझ्याकडे नाही. सहा महिन्यापूर्वीच त्याने काम सोडले आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंध नाही.-सुरेश भोळे, आमदार