सव्वा दोन कोटी निधी आमदारांनी पळविला जि.प.त तातडीची बैठक : पदाधिकार्यांचीही नाराजी; वरिष्ठांशी चर्चा
By admin | Published: March 30, 2016 12:25 AM2016-03-30T00:25:46+5:302016-03-30T00:25:46+5:30
जळगाव- जिल्हा परिषदेला जनसुविधा अंतर्गत विविध कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून सव्वा दोन कोटी रुपये प्राप्त झाले. पण या निधीत १२ आमदारांनी प्रत्येकी १२ लाख आणि दोन खासदारांनी प्रत्येकी २४ लाख रुपये असे नियोजन करून हा निधी पळविला. याबाबत जि.प.च्या पदाधिकार्यांसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
Next
ज गाव- जिल्हा परिषदेला जनसुविधा अंतर्गत विविध कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून सव्वा दोन कोटी रुपये प्राप्त झाले. पण या निधीत १२ आमदारांनी प्रत्येकी १२ लाख आणि दोन खासदारांनी प्रत्येकी २४ लाख रुपये असे नियोजन करून हा निधी पळविला. याबाबत जि.प.च्या पदाधिकार्यांसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. जि.प.चे २० सदस्य जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य आहेत. त्यांना न विचारता, सूचना न देता आमदार व खासदार यांनी परस्पर हा निधी वळता केल्याबाबत पदाधिकार्यांनीही नाराजी व्यक्त केली. तातडीने घेतली बैठकहा निधी मार्च एंडच्या धामधूमीत मागील आठवड्यात जि.प.ला मिळाला. पण कुणालाही कुठलीही सूचना न देता हा निधी कसा पळविला गेला याबाबत चर्चा करण्यासाठी जि.प.तील पदाधिकारी व सदस्यांनी मंगळवारी दुपारी बैठक घेतली. त्यात अध्यक्ष प्रयाग कोळी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमलेंसह काही सदस्य व इतर पदाधिकारी सहभागी झाले. जि.प.च्या सदस्यांना आता १४ व्या वित्त आयोगातून निधी मिळणे बंद झाले आहे... जनसुविधा अंतर्गत नियोजन समितीने दिलेला निधीही पळविला जाईल तर सदस्यांनी कुठल्या निधीतून आपली कामे मार्गी लावावीत, मतदारांना काय सांगावे, असे प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केले. प्रशासनाशी चर्चालागलीच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांशीही जि.प.तील पदाधिकार्यांनी चर्चा केली. त्यात जि.प.त ६८ सदस्य आहेत. त्यांनाही जनसुविधा अंतर्गत निधी दिला जावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावर जि.प.च्या सदस्यांनाही निधी दिला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.