आमदारांनाही प्रश्नोत्तरांचे संच नाहीत!

By admin | Published: July 22, 2015 12:34 AM2015-07-22T00:34:18+5:302015-07-22T00:34:18+5:30

विधानसभा अधिवेशन : १०० टक्के ऑनलाईन कामकाज

MLAs have no set of questions! | आमदारांनाही प्रश्नोत्तरांचे संच नाहीत!

आमदारांनाही प्रश्नोत्तरांचे संच नाहीत!

Next
धानसभा अधिवेशन : १०० टक्के ऑनलाईन कामकाज
पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन हे पूर्णपणे ऑनलाईन होणार असून आमदार व मंत्र्यांसाठीही प्रश्नोत्तराच्या छापील प्रती दिल्या जाणार नाहीत. तांत्रिक अडचण निर्माण झालीच, तर खबरदारी म्हणून ५ छापील संच ठेवण्यात येणार आहेत.
सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी पावसाळी अधिवेशनाची माहिती देताना सांगितले की, कागदविरहित कामकाज यशस्वी होताना दिसत आहे. बहुतेक आमदारांनी प्रश्न ऑनलाईनच पाठविले होते. सरकारची सर्व खातीही ऑनलाईन पद्धतीनेच उत्तरे पाठविण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे आता पुढील टप्पा म्हणून विधानसभा सदस्यांना दिले जाणारे प्रश्नोत्तराचे संचही या वेळी दिले जाणार नाहीत. सर्वांनाच ऑनलाईन उत्तरे दिली जातील. मात्र, अडचण निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून प्रश्नोत्तराचे पाच संच सभागृहात उपलब्ध केले जातील.
ऑनलाईन प्रश्नोत्तरे शोधण्यासाठीची पद्धतही सुटसुटीत करण्यात आली असून विधानसभेच्या वेबसाईटवर एका प्रश्नाचे उत्तर पाहत असताना बॅक बटन दाबून पुन्हा प्रश्नसुचीच्या मेनूवर जाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यापूर्वी एकदा बॅक बटन दाबले की एकदम वेबसाईटवर पोहोचत होते. त्यामुळे वेळ वाया जात होता. (प्रतिनिधी)
३१०० प्रश्न
अतापर्यंत एकूण ३१०० प्रश्न आले आहेत. त्यातील २००० प्रश्न हे ऑनलाईन पद्धतीने आले आहेत, तर केवळ ११०० प्रश्न कागदावर लिहून पाठविण्यात आल्याची माहिती सभापतींकडून देण्यात आली. तारांकित व अतारांकित प्रश्न नियमानुसार व बॅलटद्वारे निश्चित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: MLAs have no set of questions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.