अपात्रता टाळण्यासाठी आमदार सुप्रीम कोर्टात; साळवे मांडणार बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:21 AM2022-06-27T06:21:07+5:302022-06-27T06:22:56+5:30
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी १६ जणांना अपात्र ठरविण्याबाबतच्या नोटिसा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष भरत गोगावले यांनी जारी केल्या आहेत. त्या नोटिसींविरोधात बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गटाने कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ कायदे पंडितांची फौज उभी केली आहे. त्याचे नेतृत्व ज्येष्ठ वकील हरीश साळवे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.