आमदाराच्या मुलाने तिघांना चिरडले
By admin | Published: July 3, 2016 01:40 AM2016-07-03T01:40:15+5:302016-07-03T01:40:15+5:30
राजस्थानातील एका आमदाराच्या मुलाने दारूच्या नशेत बीएमडब्ल्यू कारची रिक्षाला धडक दिली. त्यात ३ जण ठार झाले. त्यानंतर या गाडीने आरोपी घेऊन चाललेल्या पोलिसांच्या
जयपूर : राजस्थानातील एका आमदाराच्या मुलाने दारूच्या नशेत बीएमडब्ल्यू कारची रिक्षाला धडक दिली. त्यात ३ जण ठार झाले. त्यानंतर या गाडीने आरोपी घेऊन चाललेल्या पोलिसांच्या व्हॅनला धडक देऊन ४ पोलिसांना जखमी केले.
सिद्धार्थ महारिया असे आरोपीचे नाव असून, तो अपक्ष आमदार नंदकिशोर महारिया यांचा मुलगा आहे. तो भरधाव वेगात गाडी चालवीत होता. त्याने प्रथम एका रिक्षाला धडक दिली. नंतर बीएमडब्ल्यू कार पोलिसांच्या व्हॅनवर आदळली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षा २00 फूट दूर जाऊन पडली. रिक्षातील दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तेवढेच लोक जखमी झाले. एक सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) आणि तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (वृत्तसंस्था)