उपमहापौरपद जाणार मनसेकडे महापौरपदी ला ?: भाजपालाही ऑफर कायम
By Admin | Published: December 27, 2015 12:12 AM2015-12-27T00:12:12+5:302015-12-27T00:12:12+5:30
जळगाव : महापालिकेत पुन्हा एकदा महापौर निवडीचे वारे वाहू लागले असून सत्ताधारी खान्देश विकास आघाडीकडून नितीन ला यांना संधीची शक्यता आहे. सत्ताधारी गटास साथ देणार्या मनसेकडे उपमहापौरपद जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तर बरोबर आल्यास भाजपाकडे भविष्यात स्थायी समिती सभापती पद जाऊ शकते असे संकेत आहेत.
ज गाव : महापालिकेत पुन्हा एकदा महापौर निवडीचे वारे वाहू लागले असून सत्ताधारी खान्देश विकास आघाडीकडून नितीन ला यांना संधीची शक्यता आहे. सत्ताधारी गटास साथ देणार्या मनसेकडे उपमहापौरपद जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तर बरोबर आल्यास भाजपाकडे भविष्यात स्थायी समिती सभापती पद जाऊ शकते असे संकेत आहेत. महापालिकेतील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीच्या महापौर राखी सोनवणे व उपमहापौर सुनील महाजन यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पुढील वर्षात म्हणजे २८ फेब्रुवारी २०१६ मध्ये संपत आहे. मनपा वर्तुळात याप्रश्नी चर्चा सुरू झाल्या आहेत. फेबु्रवारीत ही निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. सत्ताधारी खान्देश विकास आघाडीचे सर्वाधक ३२ सदस्य मनपात आहेत. मात्र बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांना यापूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेस व त्यानंतर मनसेचा पाठिंबा घ्यावा लागला. आघाडीतफेर्े महापौर पदासाठी नितीन ला यांचे नाव निित होण्याची शक्यता आहे. खाविआ-मनसेमनसे पूर्वी भाजपाशी जवळीक साधून होते. मात्र काही वादांच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष भाजपापासून दूर गेला. या पक्षाचे मनपात १२ सदस्य आहेत. मनपात स्थायी समिती सभापती निवडीवेळी मनसेने सत्ताधारी खान्देश विकास आघाडीशी जवळीक साधली. परिणामी आगामी निवडणुकीत या पक्षाला उपमहापौरपद मिळू शकते. या पदावर मनपा सभागृहातील मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक विजय कोल्हे यांची वर्णी र्लागण्याची शक्यता आहे. ...तर भाजपाकडे स्थायी समितीराज्यात भाजपा हा सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाच्या मदतीने विकास निधी मिळून कामांना गती मिळावी या उद्देशाने सत्ताधारी खाविआने पूर्वी भाजपाला स्थायी समिती सभापती पद देण्याची ऑफर दिली होती. मात्र भाजपाने त्यास नकार दिला. महापौर पदावर या पक्षाचा दावा असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. पूर्वीची स्थायी सभापती पदाची ऑफर आजही कायम असल्याचे याप्रश्नी बोलताना नितीन ला यांनी सांगितले.