म्युच्युअल फंडसाठी बीएसईने आणले मोबाइल अॅप
By admin | Published: January 10, 2017 12:51 AM2017-01-10T00:51:11+5:302017-01-10T00:51:11+5:30
म्युच्युअल फंडांचे ट्रेडिंग गुंतवणूकदारांसाठी आणखी सोयीचे करण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) ‘बीएसई स्टार एमएफ’ नावाचे मोबाइल अॅप आणले आहे.
मुंबई : म्युच्युअल फंडांचे ट्रेडिंग गुंतवणूकदारांसाठी आणखी सोयीचे करण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) ‘बीएसई स्टार एमएफ’ नावाचे मोबाइल अॅप आणले आहे.
हे अॅप सध्या अॅण्ड्रॉईड मोबाइल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. बीएसईकडून बीएसई स्टार एमएफ हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म चालविला जातो. हा भारतातील सर्वांत मोठा म्युच्युअल फंड वितरण प्लॅटफॉर्म आहे. दरमहा ४ लाख एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स) त्यातून होतात. बीएसईने एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली. परिपत्रकात म्हटले आहे की, बीएसई स्टार एमएफ अॅप गुगल प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करता येते.
या प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. संपत्ती व्यवस्थापन कंपन्यांसाठी सोपा पद्धतीने व्यवहार करणे तसेच अमर्याद आॅर्डर प्रवाह हाताळणे त्यामुळे सोपे होईल. (वाणिज्य प्रतिनिधी)