मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार फक्त इतके रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 01:29 PM2017-12-19T13:29:50+5:302017-12-19T13:30:43+5:30

मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत.

For mobile number portability, customers will have to pay just Rs | मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार फक्त इतके रूपये

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार फक्त इतके रूपये

Next

नवी दिल्ली- मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत. मोबाइल फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आतापर्यंत आपला नंबर दुसऱ्या सीमकार्ड कंपनीच्या सेवेसाठी पोर्ट करण्यासाठी 19 रूपये मोजावे लागत होते. पण, आता या पैशांमध्ये कपात करण्यात येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) यासाठीचा प्रस्ताव मांडला आहे.  मोबाइलनंबर पोर्ट करण्यासाठी असणारं 19 रूपये शुल्क कमी करून ते 4 रूपये करावं, असा प्रस्ताव ट्रायने मांडला आहे.

नेटवर्क वर्तुळातील दुसऱ्या कंपनीची सेवा घेण्याची मुभा देणारी नंबर पोर्टेबिलिटी ही सुविधा 1 जानेवारी 2011 पासून सुरू करण्यात आली. नोव्हेंबर 2009 मध्ये दूरसंचार नियामक प्राधिकरणाने या सेवेसाठी 19 रुपये निश्चित केले होते. पण, लवकरच हे शुल्क 19 रूपयांवरून कमी होणार असून  4 रुपये होणार आहे. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीच्या सुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय मोठ्याप्रमाणावर कमी झाली. सुरूवातीच्या काळात या सुविधेसाठी 19 रूपये आकारलं जाणं योग्य होतं. पण, आताच्या काळात हे शुल्क जास्त आहे, असा अभिप्राय नोंदवत ट्रायने नंबर पोर्टेबिलिटीच्या सुविधा शुल्कात ८० टक्क्यांनी घट करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे लवकरच ग्राहकांना नंबर पोर्टेबिलिटीसाठी फक्त ४ रुपये मोजावे लागणार आहेत.

ट्रायने म्हंटलं की, मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी परवानगी दिल्यानंतर 2014-2015मध्ये मोबाइल पोर्टिंगमधून 3.68 कोटी रूपये मिळाले तर 2016-2017मध्ये 6.36 कोटी रूपये मिळाले. 
 

Web Title: For mobile number portability, customers will have to pay just Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल