बाबो! Amazon वरुन 40 हजारांचा मोबाईल मागवला अन् पार्सल उघडताच धक्काच बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 08:45 AM2020-11-05T08:45:15+5:302020-11-05T08:48:22+5:30
Amazon Mobile Ordered : अॅमेझॉनवरून एका व्यक्तीने तब्बल 40 हजारांचा मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र पार्सल उघडून पाहिल्यावर त्या व्यक्तीला मोठा धक्का बसला आहे.
नवी दिल्ली - ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. अॅमेझॉनवरून एका व्यक्तीने तब्बल 40 हजारांचा मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र पार्सल उघडून पाहिल्यावर त्या व्यक्तीला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीलीभीतच्या कनक गावात राहणाऱ्या हरदीप सिंह याने 24 ऑक्टोबरला ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला होता. अॅमेझॉनवरून हा फोन मागवण्यात आला असून त्याची किंमत जवळपास 40,000 रुपये होती. पार्सल घरी आल्यावर त्याने जेव्हा ते उघडलं तेव्हा त्याची निराशा झाली कारण त्यामध्ये मोबाईल नव्हताच. मोबाईल ऐवजी एक ड्रेस पार्सलमध्ये होता. संतप्त झालेल्या हरदीपने कंपनीला फोन केला. तेव्हा कंपनीने त्याच्याकडे सात दिवसांचा कालावधी मागून घेतला.
अॅमेझॉन कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल
सात दिवसांनंतर कंपनीने हरदीपला फोन केला आणि आपल्याकडून काहीच चूक झाली नव्हती. आपण योग्य पार्सल पाठवलं होतं, असं सांगितलं आहे. हरदीपने जहानाबाद पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. जहानाबाद पोलीस ठाण्यातील पोलीस हर्षवर्द्धन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार आमच्याकडे दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आम्ही तपास करत आहोत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
...म्हणून "बाबा का ढाबा" चर्चेत आणणाऱ्या व्यक्तीविरोधात कांता प्रसाद यांनी केली पोलिसांत तक्रारhttps://t.co/y6UMy9ACTV#BabaKaDhabha#Delhi#Police#KantaPrasad
— Lokmat (@MiLOKMAT) November 2, 2020
Amazon वरुन मागवला 1.40 लाखांचा कॅमेरा पण आल्या चपला आणि दगड
ऑनलाईन वस्तू मागवल्यावर फसवणूक झाल्याच्या अशा अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अॅमेझॉनवरून एका व्यक्तीने 1.40 लाखांचा कॅमेरा मागवला होता. मात्र प्रत्यक्षात घरी चपला आणि दगड आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सुमित चौहान यांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाईन शॉपिंग करीत कॅमेरा मागविला होता. सुमित यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या अॅमेझॉनमधून कॅमेरा मागविला होता. मात्र घरी जेव्हा ऑर्डर आली ती पाहून त्यांना धक्काच बसला. बॉक्स उघडल्यानंतर त्यांना कॅमेऱ्याऐवजी जुन्या चपला आणि दगड मिळाले होते. या एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
...अन् 'त्या' मजुरांचं नशीबच चमकलं, लाखो रुपये किमतीचे सापडले हिरे https://t.co/h6lLuJnHa3#diamonds
— Lokmat (@MiLOKMAT) November 4, 2020
कौतुकास्पद! लडाखमधील गोठवणाऱ्या थंडीत व अत्यंत कठीण परिस्थिती केली शस्त्रक्रियाhttps://t.co/pir2elrPGo#IndianArmy#doctors
— Lokmat (@MiLOKMAT) November 2, 2020