सभागृहात फोन वापरल्याबद्दल अनुराग ठाकूर यांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:28 AM2017-07-27T03:28:27+5:302017-07-27T03:28:33+5:30

भाजपचे अनुराग ठाकूर यांनी सोमवारी सभागृहात मोबाइल फोनवर चित्रिकरण केल्याबद्दल बुधवारी खेद व्यक्त केल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बुधवारी सभागृहात सदस्यांना मोबाईल फोनच्या वापराबद्दल त्यांना कडक शब्दांत इशारा दिला.

Mobile Phone Use In Parliament, Anurag Thakur Expresses Regret | सभागृहात फोन वापरल्याबद्दल अनुराग ठाकूर यांची माफी

सभागृहात फोन वापरल्याबद्दल अनुराग ठाकूर यांची माफी

Next

शीलेश शर्मा
नवी दिल्ली : भाजपचे अनुराग ठाकूर यांनी सोमवारी सभागृहात मोबाइल फोनवर चित्रिकरण केल्याबद्दल बुधवारी खेद व्यक्त केल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बुधवारी सभागृहात सदस्यांना मोबाईल फोनच्या वापराबद्दल त्यांना कडक शब्दांत इशारा दिला. मात्र संसद भवनात असेच चित्रिकरण करणाºया आम आदमी पार्टीच्या भगवंत मान यांना शिक्षा सुनावणाºया लोकसभाध्यक्षांनी अनुराग ठाकूर यांना केवळ माफीवर सोडून दिल्याबद्दल काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली.
सुमित्रा महाजन यांचे नाव न घेता, सभागृहात पक्षपात केला जातो, असा आरोप खरगे यांनी केला. लोकसभाध्यक्ष या पदाचाही उल्लेख न करता ते म्हणाले की, विरोधी पक्षांना अनेकदा बोलण्याची संधी दिली जात नाही. सत्ताधारी सदस्यांनाच बोलण्यास दिले जाते. सरकारच्या दबावाखाली हे होत आहे, लोकसभेबाहेर पत्रकारांशी बोलतानाही खरगे यांनी सरकार फॅसिसट् पद्धतीने काम करीत आहे, असा आरोप केला.
सोमवारी विरोधक सभागृहात लोकसभाध्यक्षांसमोरील जागेत येऊ न निषेध व्यक्त करीत होते, तेव्हा अनुराग ठाकूर यांनी ठाकूर यांनी मोबाइलवरून त्याचे चित्रिकरण केले होते. विरोधी सदस्यांनी ही बाब बुधवारी लोकसभाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. आम आदमी पक्षाचे सदस्य भगवंत मान यांनी महाजन यांच्याकडे तक्रारही केली. त्यावर सुमित्रा महाजन असे चित्रिकरण होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले नाही, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या. पण कोणी सदस्याने तसे काही केले असेल ते नक्कीच निषेधार्ह आहे. त्यानंतर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अनुराग ठाकूर यांना उद्देशून, तुम्ही ते चित्रिकरण केले असेल, तर त्याबद्दल सभागृहात माफी मागितली पाहिजे, असे सांगितले. लोकसभाध्यक्षांच्या या इशाºयानंतर ठाकूर यांनी निवेदन करून खेद व्यक्त केला. ठाकूर म्हणाले की, मोबाइल से अगर किसीको आपत्ती है तो मै खेद व्यक्त करता हूं. मात्र चित्रिकरणाविषयी ते काहीही बोलले नाहीत. ते खेद व्यक्त करीत असताना विरोधकांकडून जोरदार गोंधळ सुरू होता. चिडलेल्या महाजन यांनी अशा घटना भविष्यात घडता कामा नयेत, असा इशारा अनुराग ठाकूर यांना दिला. अशी चूक पुन्हा होता कामा नये, असेही लोकसभाध्यक्षांनी त्यांना सुनावले.


अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभाध्यक्षांकडे केला. सभागृहाबाहेर, पण संसद परिसरात भगवंत मान यांनी मोबाइलवर चित्रीकरण केल्याबद्दल त्यांना दोन सत्रांसाठी निलंबित करण्यात आले होते, याची आठवण करून देत ते म्हणाले की, इथेही तोच न्याय लावायला हवा होता.

Web Title: Mobile Phone Use In Parliament, Anurag Thakur Expresses Regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.