हार्दीक पटेलच्या तुरुंगाबाहेर सापडले मोबाईल फोन

By admin | Published: March 5, 2016 07:14 PM2016-03-05T19:14:19+5:302016-03-05T19:14:19+5:30

पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या कारागृहाबाहेरुन मोबाईल फोन सापडल्याची माहिती समोर आली आहे

Mobile phones found outside Hardik Patel's jail | हार्दीक पटेलच्या तुरुंगाबाहेर सापडले मोबाईल फोन

हार्दीक पटेलच्या तुरुंगाबाहेर सापडले मोबाईल फोन

Next
>ऑनलाइन लोकमत - 
सुरत, दि. ५ - पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या कारागृहाबाहेरुन मोबाईल फोन सापडल्याची माहिती समोर आली आहे. हार्दीक पटेल सध्या लाजपोर कारागृहात आहे.  पटेलच्या कारागृहाबाहेर 2 मोबाईल फोन, चार्जर्स आणि फोनची बॅटरी सापडली आहे.
कारागृहातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे  तुरुंग अधिका-यांना तपासणी करताना हार्दीक पटेलच्या तुरुंगाबाहेर शुक्रवारी एक मोबाईल सापडला होता. त्यानंतर केलेल्या तपासणीत अजून एक मोबाईल हॅण्डसेट, मोबाईल बॅटरी आणि 2 चार्जर सापडले. तुरुंग अधिकारी डी पी रबारी यांनी सचिन पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. उपअधीक्षक व्ही डी पाटील यांनी पोलीस तपास करत असल्याची माहिती दिली आहे. 
 

Web Title: Mobile phones found outside Hardik Patel's jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.