मोबाईल दुकानदारांकडून ग्राहकाला बेदम मारहाण गोलाणीतील प्रकार : वेळेत मोबाईल दुरुस्ती करुन न दिल्याने झाला वाद

By Admin | Published: June 7, 2016 06:37 PM2016-06-07T18:37:48+5:302016-06-07T18:37:48+5:30

जळगाव: दुरुस्तीची रक्कम आगाऊ देऊनही वेळेत मोबाईल न दिल्याने उद्भवलेल्या वादातून मोहाडी (ता.जळगाव) येथील एका तरुणास (ग्राहक) मोबाईल विक्री व दुरुस्ती करणार्‍या दुकानदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये घडली. दरम्यान, यावेळी ४० ते ५० दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली होती. याप्रकरणी पोलीस स्टेशनला कोणतीच नोंद नाही. गेल्या आठवड्यातही एका नगरसेवकाने याच मार्केटमध्ये एका तरुणाला झोडपून काढले होते.

Mobile shopkeepers face severe assault cylinders: Time has not been done due to mobile repair | मोबाईल दुकानदारांकडून ग्राहकाला बेदम मारहाण गोलाणीतील प्रकार : वेळेत मोबाईल दुरुस्ती करुन न दिल्याने झाला वाद

मोबाईल दुकानदारांकडून ग्राहकाला बेदम मारहाण गोलाणीतील प्रकार : वेळेत मोबाईल दुरुस्ती करुन न दिल्याने झाला वाद

googlenewsNext
गाव: दुरुस्तीची रक्कम आगाऊ देऊनही वेळेत मोबाईल न दिल्याने उद्भवलेल्या वादातून मोहाडी (ता.जळगाव) येथील एका तरुणास (ग्राहक) मोबाईल विक्री व दुरुस्ती करणार्‍या दुकानदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये घडली. दरम्यान, यावेळी ४० ते ५० दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली होती. याप्रकरणी पोलीस स्टेशनला कोणतीच नोंद नाही. गेल्या आठवड्यातही एका नगरसेवकाने याच मार्केटमध्ये एका तरुणाला झोडपून काढले होते.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, मोहाडी येथील एका तरुणाने गोलाणी मार्केटमध्ये एका दुकानात मोबाईल दुरुस्तीला टाकला होता. सोमवारी हा मोबाईल दुरुस्त करुन मिळेल, असे दुकानदाराने सांगितले होते, मात्र सोमवारी मोबाईल मिळाला नाही. दुरुस्तीची पूर्ण रक्कम देण्यात आली होती. मंगळवारी हा तरुण त्याच्या दोन मित्रासह दुकानात मोबाईल घ्यायला गेला असता तेव्हाही मोबाईल दुरुस्त झालेला नव्हता, त्यामुळे दुकानदाराशी त्याने वाद घातला. यात काही तरी आक्षेपार्ह विधान केल्याने संतप्त झालेल्या दुकानदाराने व त्याचासोबतच्या काही जणांनी त्याला मारहाण केली. हा प्रकार पाहून त्याच्यासोबतचे दोन तरुण पळून गेले. हा तरुणही पळत असताना त्याला नाश्त्याच्या गाडीजवळ अडविण्यात आले. सुमारे ४० ते ५० जणांनी आपआपली दुकाने बंद करुन त्याला बदडून काढले. यावेळी सुमारे दोनशेच्यावर समाजबांधव त्या ठिकाणी जमले होते.
पोलिसात तक्रार नाही
या प्रकाराची मार खाणारा व मार देणारा यापैकी कोणीही पोलिसात तक्रार दिली नाही. त्यामुळे याविषयी कोणतीच नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातही एका नगरसेवकाने तरुणाला बेदम मारहाण केली होती, तेव्हादेखील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, मोबाईल दुकानदार व ग्राहक यांच्यात नेहमीच असे वादाचे प्रसंग घडतात.

Web Title: Mobile shopkeepers face severe assault cylinders: Time has not been done due to mobile repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.