मोबाइल सिम कार्ड-आधार कार्डची जोडणी केली का? नसेल तर हे नक्की वाचा, नाही तर मोबाइल सेवा होणार खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 03:23 PM2017-09-11T15:23:45+5:302017-09-11T15:26:05+5:30

फेब्रुवारी 2018 पर्यंत मोबाइल सिम कार्ड (SIM) आधार कार्डसोबत जोडून घ्या अन्यथा तुमचा मोबाइल क्रमांक डिअॅक्टिव्हेट होण्याची शक्यता अधिक आहे.

Mobile SIM card-Aadhaar card connection? If not, read it exactly, otherwise the mobile service will break | मोबाइल सिम कार्ड-आधार कार्डची जोडणी केली का? नसेल तर हे नक्की वाचा, नाही तर मोबाइल सेवा होणार खंडित

मोबाइल सिम कार्ड-आधार कार्डची जोडणी केली का? नसेल तर हे नक्की वाचा, नाही तर मोबाइल सेवा होणार खंडित

Next

नवी दिल्ली, दि. 11 - फेब्रुवारी 2018 पर्यंत मोबाइल सिम कार्ड (SIM) आधार कार्डसोबत जोडून घ्या अन्यथा तुमचा मोबाइल क्रमांक डिअॅक्टिव्हेट होण्याची शक्यता अधिक आहे. जर तुम्ही एक पेक्षा अधिक मोबाइल क्रमांक वापरत असाल तर सिम कार्ड आधार कार्डसोबत जोडण्याची घाई लवकर केली तरच तुमच्याच फायद्याचे आहे.  तुम्ही अद्यापपर्यंत मोबाइल क्रमांक आधार कार्डसोबत जोडलेला नाही?  नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. मोबाइल सेवा खंडित होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर लवकरच सिम कार्ड आधार कार्डसोबत जोडून घ्या.

वाचा : कसे कराल मोबाइल सिम कार्ड आधार कार्डसोबत लिंक ?
1. तुम्हाला मोबाइल सेवा प्रदात्यांकडून (Service Provider) केव्हायसी अपडेट करण्यासंदर्भातील संदेश मिळाला असल्यास लवकरात लवकर आपल्या आधार कार्ड घेऊन रीटेल स्टोरमध्ये जा. 
2. समजा तुम्हाला अद्यापपर्यंत असा कोणताही संदेश मिळालेला नाही. तरी हरकत नाही, तुम्ही स्वतः कस्टमर केअरला संपर्क साधून यासंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.   
3. रीटेल स्टोअरमधील कर्मचा-याला आपला मोबाइल क्रमांक आणि आधार कार्डची संपूर्ण माहिती द्या.   
4. व्हेरिफिकेशन केल्यानंतर रीटेल स्टोअरमधील कर्मचारी तुमच्या मोबाइल क्रमांकावर एक व्हेरिफिकेशन कोड पाठवेल. हा कोड कर्मचा-याला सांगून त्याबाबत पुष्टी करुन घ्यावी. 
5. 24 तासांच्या आत तुमच्या मोबाइल क्रमांवर आणखी एक व्हेरिफिकेशन कोड येईल. आलेल्या मेसेज तुम्हाला केवळ 'हो' किंवा 'नाही' ( Yes Or NO ) असे उत्तर द्यावे लागेल.  
6. महत्त्वाचे म्हणजे टेलिकॉम ऑपरेटद्वारे या कामासाठी कोणत्याही प्रकारे शुल्क आकारण्यात येत नाही
7. आधार क्रमांकाव्यतिरिक्त तुमच्याकडून कोणत्याही अन्य कागदपत्रांची मागणी करण्यात येत नाही, हे देखील लक्षात ठेवा.

केंद्र सरकारनं सर्व मोबाइल सिम कार्ड फेब्रुवारी 2018 पर्यंत आधार कार्डसोबत लिंक करण्यासंदर्भातील एक नोटीस जारी केली आहे. दिलेल्या कालावधीत तुम्ही मोबाइल सिम कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचा मोबाइल क्रमांक डिअॅक्टीव्हेट करण्यात येईल. खोटी कागदपत्रं देऊन सिम कार्ड घ्यायचं आणि ते गुन्ह्यांसाठी वापरून नंतर फेकून द्यायचं, असे अनेक प्रकार आपल्याकडे घडले आहेत. अनेक दहशतवाद्यांनीही अशा पद्धतीने सिम कार्ड वापरल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे सरकारनं हे मोठा निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना याबाबत नोटीस पाठवली आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड सबस्क्रायबर्सचं ई-केवायसी व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिले आहेत. टेलिकॉम कंपन्यांनी 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत  ई-केवायसी रि-व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश आहेत. देशातील 100 कोटींहून अधिक मोबाइल ग्राहकांची ओळख पडताळून पाहण्यासाठी सिम कार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली आहे.  दहशतवाद्यांकडून मोबाइल फोनचा वापर होऊ शकतो त्यामुळे आवश्यक कागदपत्रे पुन्हा एकदा तपासण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे.

'आधार-पॅन'लिंक करण्याची मुदत वाढवली
आधारकार्डला पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही आधारकार्डशी पॅनकार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होईल. त्यामुळे पॅनकार्ड लिंक करून घ्या. आधारकार्डशी पॅनकार्ड लिंक करण्यासाठी या आधीही मुदतवाढ देण्यात आली होती. ३१ ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. ती आज संपत असताना पून्हा एकदा आधारकार्डला पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत वाढवण्यात आली आहे.. आधार पॅनशी लिंक केले नाही तर पॅनकार्ड रद्द होईल आणि नवे पॅनकार्ड काढावे लागेल. तसेच आधारकार्डशी पॅनकार्ड लिंक झाले नाही तर अनेक अर्थिक कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतील. इन्कम टॅक्स रिटर्नही भरता येणार नाही. भरला तरी तो मान्य होणार नाही. तुमचा पगारही रोखला जाऊ शकतो. त्यामुळे वेळात वेळ काढून आणि जिथे असाल तिथून पॅनकार्ड लिंक करून घ्या.

Web Title: Mobile SIM card-Aadhaar card connection? If not, read it exactly, otherwise the mobile service will break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.