सिक्कीम सरकारने उभारले मोबाईल टेस्टिंग बूथ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:57 AM2020-04-27T03:57:37+5:302020-04-27T04:05:43+5:30
पूर्व सिक्कीम हे सिक्कीम राज्याचे प्रवेशद्वार मानले जाते. सिक्कीममध्ये लॉकडाऊन अंशत: शिथिल केल्यानंतर याच भागातून लोक सिक्कीममध्ये येत आहेत.
गंगटोक : सिक्कीम सरकारने ‘कोविड-१९’विरुद्धच्या लढ्यात महत्वपूर्ण पाऊल टाकताना मोबाईल (फिरते) टेस्टिंग बूथ उभारण्याची स्वागतार्ह कृती केली आहे. पूर्व सिक्कीममध्ये आरोग्यमंत्री डॉ. एम. के. शर्मा यांच्या हस्ते कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबतची नेमकी माहिती देणाऱ्या मोबाईल टेस्टिंग बूथचे उद्घाटन शनिवारी झाले. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या पत्नी कृष्णा रॉय यांनी देणगी स्वरुपात हे मोबाईल टेस्टिंग बूथ दिले आहे. उद्घाटनानंतर आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभागाच्या संचालकांनी रंगपो चेकपोस्ट आणि परिसराची पाहणी केली. पूर्व सिक्कीम हे सिक्कीम राज्याचे प्रवेशद्वार मानले जाते. सिक्कीममध्ये लॉकडाऊन अंशत: शिथिल केल्यानंतर याच भागातून लोक सिक्कीममध्ये येत आहेत.