'एका दिवसात लाख रुपये कमवा' असे सांगत मॉडल्सना लाखो रुपयांना गंडविले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 02:37 PM2018-07-09T14:37:13+5:302018-07-09T14:43:25+5:30

मॉडल बनण्याचे स्वप्न उरी बागळणा-या मुला-मुलींना लाखों रुपयांना गंडविण्यात आल्याची घटना घडली आहे. डच फिल्मसाठी मॉडलिंग कॉन्ट्रक्ट आणि प्रोफेशनल फोटोशूटच्या नावाखाली आरोपीने या मुला-मुलींच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले आहेत. 

models trapped by 1 lakh offer a day | 'एका दिवसात लाख रुपये कमवा' असे सांगत मॉडल्सना लाखो रुपयांना गंडविले 

'एका दिवसात लाख रुपये कमवा' असे सांगत मॉडल्सना लाखो रुपयांना गंडविले 

Next
ठळक मुद्दे'एका दिवसात लाख रुपये कमवा' असे सांगत मॉडल्सना लाखो रुपयांना गंडवले फोटोशूटच्या नावाखाली मुला-मुलींच्या बँक खात्यातून पैसे लंपास मॉडल्सना आरोपीने जवळपास 5 लाख रुपयांचा गंडा घातला

नवी दिल्ली : मॉडल बनण्याचे स्वप्न उरी बागळणा-या मुला-मुलींना लाखों रुपयांना गंडविण्यात आल्याची घटना घडली आहे. डच फिल्मसाठी मॉडलिंग कॉन्ट्रक्ट आणि प्रोफेशनल फोटोशूटच्या नावाखाली आरोपीने या मुला-मुलींच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले आहेत. 
कॉलेज फॅशन सोसायटीची सदस्य आणि दिल्ली विद्यापीठीच्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने सांगितले की, दोन आठवड्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज आला होता. यामध्ये संशयित आरोपीने सांगितले की, एक फिल्म मॉडल्सचे फोटोशूट करत आहे. तसेच, आरोपीने सांगितले की डच फॅशन कंपनीचा वरिष्ठ एजेंट आहे. तो, म्हणाला या फिल्मसाठी मुले आणि मुलींच्या मॉडल्सची गरज आहे. तीन दिवसांसाठी फोटोशूटसाठी 3 लाख रुपये देण्याचा दावा सुद्धा यावेळी त्याने केला .   
एका तक्रारदाराने सांगितले की, त्याला 28 जूनला साऊथ दिल्लीतील महिपालपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. यावेळी हॉटेलच्या खोलीत आधीच सहा-सात मॉडल्स उपस्थित होत्या. एजेंट त्याच हॉटेलच्या दुस-या खोलीत राहत होता. त्याने एका दिवसासाठी फोटोशूट केले तर एक लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती. तसेच, आम्हाला सांगण्यात आले होते की, पेमेंट युरो मध्ये करण्यात येईल. या चर्चेनंतर एजेंटने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बॅंकचे डिटेल्स मागितले. त्यानंतर आमच्या बॅंक खात्यातून पैसे लंपास झाल्याचे स्पष्ट झाले.     
दरम्यान, याप्रकरणी पोलीस चौकशी करत असून या मॉडल्सना आरोपीने जवळपास 5 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समजते. अतिरिक्त डीसीपी (साऊथवेस्ट) मोनिका भारद्वाज यांनी सांगितले की, याप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: models trapped by 1 lakh offer a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.