Corona Vaccine: केंद्राशीच थेट करार, राज्यांना ‘मॉडर्ना’ लस मिळणार नाही; पंजाबचा प्रस्ताव फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 09:21 PM2021-05-23T21:21:58+5:302021-05-23T21:23:17+5:30

Corona Vaccine: पंजाब सरकारने पाठवलेला प्रस्ताव फेटाळत थेट राज्यांना लस देण्यास मॉडर्ना कंपनीने नकार दिला आहे.

moderna refuses to send vaccine in punjab said contract will done only with central government | Corona Vaccine: केंद्राशीच थेट करार, राज्यांना ‘मॉडर्ना’ लस मिळणार नाही; पंजाबचा प्रस्ताव फेटाळला

Corona Vaccine: केंद्राशीच थेट करार, राज्यांना ‘मॉडर्ना’ लस मिळणार नाही; पंजाबचा प्रस्ताव फेटाळला

googlenewsNext

चंदीगड: गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत घसरण पाहायला मिळत असली, तरी वाढत्या मृत्युंमुळे चिंतेत भर पडत आहे. कोरोना लसीकरणावर भर दिला जात असून, लसीकरण मोहिम वेगवान व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनंतर आता स्पुटनिक व्ही लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मॉडर्ना लसीला भारतात मंजुरी देण्याबाबत चर्चा सुरू असली, तरी पंजाब सरकारने पाठवलेला प्रस्ताव फेटाळत थेट राज्यांना लस देण्यास मॉडर्ना कंपनीने नकार दिला आहे. (moderna refuses to send vaccine in punjab said contract will done only with central government)

अमेरिकेची सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या मॉडर्ना कंपनीला कोरोना लसीचे डोस मिळण्याबाबत पंजाब सरकारने प्रस्ताव पाठवला होता. मात्र, तो प्रस्ताव मॉडर्ना कंपनीकडून फेटाळण्यात आला आहे. पंजाबचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि कोव्हिड व्हॅक्सिनेशनचे नोडल अधिकारी विकास गर्ग यांनी यासंदर्भातील माहिती दिली.  

गंभीर परिस्थितीत AIIMS च्या दिशाभूल करणाऱ्या गाइडलाइन्स; लष्करी सेवेतील डॉक्टरांनी झापलं

देशातील अनेक राज्यांचे ग्लोबल टेंडर

देशातील काही राज्यांनी कोरोनावरील लस मिळावी यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोना लसी मिळण्यासाठी पंजाबने मॉडर्ना कंपनीला प्रस्ताव पाठवला होता. अमेरिकन औषध कंपनी मॉडर्नाने पंजाब सरकारला स्पष्टपणे सांगितले आहे की, ते केवळ भारत सरकारसोबत व्यवहार करतील. अमेरिकेच्या प्रसिद्ध असलेल्या मॉडर्ना या कोव्हिड लस निर्मिती कंपनीकडून हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, ज्यावेळी राज्य सरकारांकडून लसीकरणासाठी दुसऱ्या देशांकडून लसींच्या मागणीसाठी संपर्क साधला जात आहे. 

करून दाखवलं! ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; नियम पाळत देशासमोर आदर्श

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा

संपूर्ण देशभरात १ मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीचा डोस घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर झाल्याचे पाहायला मिळाले. लसी कमतरतेच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांनी ग्लोबल टेंडर काढून थेट परदेशी लस निर्मिती कंपनींना प्रस्ताव पाठवले. 

‘ते’ कंपनीचं अधिकृत वक्तव्य नाही; सरकारवरील टीकेनंतर सीरमचं स्पष्टीकरण

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ४० हजार ८४२ नवीन कोरोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५५ हजार १०२ रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात सध्या २८ लाख ५ हजार ३९९ रुग्ण हे उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी गेला आहे. 
 

Web Title: moderna refuses to send vaccine in punjab said contract will done only with central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.