देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे 'हे' गाव; घरांमध्ये वीज बिल येतंय झिरो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 08:51 PM2022-10-07T20:51:09+5:302022-10-07T20:51:52+5:30

solar powered village : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आगामी गुजरात दौऱ्यात 9 ऑक्टोबर रोजी मोढेरा हे चोवीस तास BESS सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करणार आहेत.

modhera of gujarat becomes first 24x7 solar powered village pm modi dream project | देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे 'हे' गाव; घरांमध्ये वीज बिल येतंय झिरो

देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे 'हे' गाव; घरांमध्ये वीज बिल येतंय झिरो

googlenewsNext

मोढेरा : सूर्य मंदिरासाठी जगप्रसिद्ध असलेले गुजरातचे मोढेरा आता देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव बनणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आगामी गुजरात दौऱ्यात 9 ऑक्टोबर रोजी मोढेरा हे चोवीस तास BESS सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करणार आहेत.

मोढेराच्या या सौरऊर्जा प्रकल्पाविषयी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले, "मला आनंद आहे की, स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्मितीचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुजरातने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेद्वारे भारताच्या 50 टक्के ऊर्जा गरजा पूर्ण करण्याचा पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."

भारत सरकार आणि गुजरात सरकारने मेहसाणा येथील सुजानपुरामध्ये बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) सह एकीकृत सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे, जो सूर्य मंदिरापासून फक्त 6 किमी अंतरावर आहे. मोढेराला 24x7 सौर उर्जेवर आधारित वीज देण्यासाठी 'सोलरायजेशन ऑफ मोढेरा सन टेम्पल अँड टाउन' हा उपक्रम सुरू केला. या प्रकल्पाच्या विकासासाठी गुजरात सरकारने 12 हेक्टर जमीन दिली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त योजना
या प्रकल्पासाठी भारत सरकार आणि गुजरात सरकारद्वारे दोन टप्प्यांमध्ये 50:50 च्या आधारावर संयुक्तपणे 80.66 कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच फेज-1 मध्ये 69 कोटी रुपये आणि फेज-2 मध्ये 11.66 कोटी रुपये. सौरऊर्जेपासून वीजेची सुविधा देण्यासाठी मोढेरा येथील 1300 घरांमध्ये प्रत्येकी एक किलोवॅट क्षमतेची सोलर रूफटॉप सिस्टीम बसवण्यात आली आहे. या सौर पॅनेलद्वारे दिवसा आणि संध्याकाळी BESS म्हणजेच बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमद्वारे वीज पुरवठा केला जाणार आहे.

हा प्रकल्प विशेष का आहे?
- या प्रकल्पाद्वारे शुद्ध अक्षय ऊर्जा उत्पादक बनणारे मोढेरा हे भारतातील पहिले गाव ठरले आहे.
- हे असे पहिले आधुनिक गाव आहे, ज्यामध्ये सौर-आधारित अल्ट्रा-मॉडर्न इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध आहे.
- भारतातील पहिली ग्रिड कनेक्टेड MWh स्केल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम स्थापित करण्यात आली आहे.
- येथील स्थानिक लोक निवासी वीज बिलावर 60 टक्के ते 100 टक्के बचत करत आहेत.

आकर्षक रोषणाईचा आनंद घेता येणार
जगप्रसिद्ध मोढेरा सूर्यमंदिरात सौरऊर्जेवर चालणारे 3-डी प्रोजेक्शन पर्यटकांना मोढेराच्या समृद्ध इतिहासाची माहिती देईल. हे 3-डी प्रक्षेपण दररोज संध्याकाळी 7:00 ते 7:30 पर्यंत केले जाईल. याशिवाय, मंदिराच्या सुशोभिकरणासाठी सौरऊर्जेवर चालणारी हेरिटेज लायटिंगही मंदिराच्या आवारात लावण्यात आली आहे. दररोज संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत प्रेक्षकांना या आकर्षक रोषणाईचा आनंद घेता येईल.

वीज बिल येतंय झिरो
केंद्र आणि राज्याच्या या प्रकल्पामुळे आम्ही ग्रामीण भागातील लोक खूप आनंदी आहोत. पूर्वी एक हजार रुपयांच्या आसपास वीज बिल येत असे, मात्र आता ते जवळपास शून्य झाले आहे. कोणत्याही खर्चाशिवाय सर्व लोकांच्या घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. या सोलर पॅनलद्वारे जेव्हा आपल्या गरजेपेक्षा जास्त ऊर्जेची बचत होते, तेव्हा सरकार आम्हाला त्यासाठी अतिरिक्त पैसेही देते, असे मोढेरा गावच्या सरपंच जतनबेन डी. ठाकोर यांनी सांगितले.

Web Title: modhera of gujarat becomes first 24x7 solar powered village pm modi dream project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.