कर्नाटक निवडणुकांसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक, यादीत महाराष्ट्राचे २ नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:12 PM2023-04-19T12:12:52+5:302023-04-19T13:37:01+5:30

भाजपाने काँग्रेस ४० स्टार प्रचारक कर्नाटकच्या मैदानात उतरवले आहेत. 

Modi and yogi BJP's 40 star campaigners for Karnataka elections, 2 Maharashtra leaders Nitin Gadkari and Devendra fadanvis on the list | कर्नाटक निवडणुकांसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक, यादीत महाराष्ट्राचे २ नेते

कर्नाटक निवडणुकांसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक, यादीत महाराष्ट्राचे २ नेते

googlenewsNext

बंगळुरू - कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. येथे 10 मे रोजी येथे मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राजकारण ढवळून निघत आहे. सत्ताधारी भाजपने तिकीट कापल्याने माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्यांपासून ते विद्यमान आणि माजी आमदारांपर्यंत अनेकांनी भाजपला 'जय श्रीराम' ठोकला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश नेते काँग्रेसच्या वाटेवर दिसत आहेत. गेल्या आठवडा भरात तब्बल आठहून अधिक बड्या राजकीय चेहऱ्यांनी भाजपची साथ सोडली आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत भाजपला पुन्हा एकदा कर्नाटकचा गड जिंकायचा आहे. कारण, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच भाजपाने ४० स्टार प्रचारक कर्नाटकच्या मैदानात उतरवले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज नेते व मंत्री कर्नाटकमध्ये प्रचारासाठी सभा घेणार आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्रातील दोन बड्या भाजप नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही नावे भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी ट्विटरवरुन शेअर केली आहे. त्यामध्ये, ४० जणांची नावे असून महाराष्ट्रातून नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे दोन नेते आहेत. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांत भाजपमधील बड्या नेत्यांनी काँग्रेसची वाट धरली आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांपासून ते माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदींपर्यंत अनेकांनी भाजपला जय श्रीराम करत पक्षातील सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे, भाजपला यंदाची कर्नाटक निवडणूक म्हणावी तेवढी सोपी राहिली नाही. भाजपने नवचेहऱ्यांना संधी दिली असून ज्येष्ठांना डावलल्याचा आरोप पक्ष नेतृत्त्वावर होत आहे. 

कुणी कुणी सोडला पक्ष -

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केल्यापासूनच अनेक नेत्यांनी पक्ष सोडचिठ्ठी दिली आहे. जगदीश शेट्टर यांनी आज (17 एप्रिल रोजी) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी पक्ष सोडल्यानंतर दोनच दिवसात म्हणेच 14 एप्रिल रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होतता.

Web Title: Modi and yogi BJP's 40 star campaigners for Karnataka elections, 2 Maharashtra leaders Nitin Gadkari and Devendra fadanvis on the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.