मोदींनी मंत्र्यांकडे मागितले प्रगतिपुस्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 04:17 AM2018-08-14T04:17:51+5:302018-08-14T04:18:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रगतीबाबत सर्व मंत्रालयांकडून माहिती मागितली आहे. स्वातंत्र्यदिनी मोदी लाल किल्ल्यावरून करणाऱ्या भाषणात यावेळी वेगवेगळ््या केंद्रीय योजनांवरील प्रगतीपुस्तक सादर करू शकतील, असे समजते
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रगतीबाबत सर्व मंत्रालयांकडून माहिती मागितली आहे. स्वातंत्र्यदिनी मोदी लाल किल्ल्यावरून करणाऱ्या भाषणात यावेळी वेगवेगळ््या केंद्रीय योजनांवरील प्रगतीपुस्तक सादर करू शकतील, असे समजते. विशेषत: जनधन, स्वच्छता, उघड्यावरील शौचापासून मुक्ती, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, डिजीटल इंडियाबद्दल मोदी त्यांच्याकडील माहिती देशाला देऊ शकतात.
मोदी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले होते त्यावेळी त्यांनी त्यावेळी म्हटले होते की मी वारंवार माझे प्रगतीपुस्तक देणार नाही तर मी जेव्हा पाच वर्षांनी येथे येईल त्यावेळी माझ्या सरकारने ज्या ज्या योजना सुरू केल्या होत्या त्यांचा अहवाल सादर करीन. मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या चार वर्षांत जवळपास शंभरपेक्षा जास्त छोट्या-मोठ्या योजनांची घोषणा झाली. त्यात जनधन, डिजीटल इंडिया, उघड्यावरील शौचापासून मुक्ती, बुलेट ट्रेन, मुद्रा कर्ज, मेक इन इंडिया, आयुष्यमान भारत या त्यांच्या आवडत्या योजनांचा समावेश आहे.
एका अधिकाºयाने सांगितले
की, सर्व मंत्रालयांना सोमवारी सायंकाळपर्यंत त्यांच्याशी संबंधित योजनांचे प्रगतीपुस्तक सादर
करण्याचे निर्देश देण्यात आले
आहेत.
काही मंत्रालयांसाठी ही कालमर्यादा मागील शुक्रवार होती. याचा मुख्य उद्देश हा होता की, वेळेवर ही आकडेवारी पीएमओकडे सादर व्हावी. जेणेकरुन अधिकारी पंतप्रधानांकडे एक विस्तृत अहवाल सादर करु शकतील.
कार्यकाळातील अखेरचे भाषण
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील लाल किल्ल्यावरील हे अखेरचे भाषण असेल. अशा वेळी काही घोषणाही होऊ शकतात. याचे कारण हे आहे की, पुढील वर्षी निवडणुका आहेत. जनधन खात्याशी लिंक एखाद्या योजनेबाबत ते काही सांगू शकतात. मात्र, भाषणात कशाचा समावेश आहे, याची माहिती कोणत्याही अधिकाºयांना नसते.