पंतप्रधान मोदी ठरले "सुपर फ्लॉप", एकही मत नाही मिळालं
By Admin | Published: April 17, 2017 06:05 PM2017-04-17T18:05:06+5:302017-04-17T18:39:36+5:30
पंतप्रधान मोदींना संभावित विजेते म्हणून गणलं जात होतं, पण मतदान बंद होईपर्यंत त्यांना एकही मत मिळवता आलं नाही.
>ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 17 - फिलिपाइन्सचे वादग्रस्त राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्तो हे प्रतिष्ठित टाइम मॅगझीन रिडर पोलमध्ये विजयी ठरले आहेत. ते जगातील सर्वात 100 प्रभावशाली लोकांमध्ये अव्वल ठरले आहेत. मात्र, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकही मत मिळालं नाही. हा एक ऑनलाइन सर्व्हे होता. यामध्ये जो व्यक्ती या वर्षीचा सर्वात प्रभावशाली व्यक्ती वाटला असेल त्यांना मतदान करण्यात आलं.
टाइम मॅगझीन रिडर पोलमध्ये मोदींना संभावित विजेते म्हणून गणलं जात होतं, पण मतदान बंद होईपर्यंत त्यांना एकही मत मिळवता आलं नाही. त्यामुळे रिडर्स पोलमध्ये मोदींना 0 टक्के मत मिळाल्याचं दाखवलं जात आहे. रविवारी मध्यरात्री यासाठी मतदान थांबवण्यात आलं. दुतेर्तो यांना कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेयू, पोप फ्रान्सीस, बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग यांनी कडवी टक्कर मिळाली. या सर्वांना यामध्ये 3 टक्के मतं मिळाली तर अव्वल ठरलेल्या रोड्रिगो दुतेर्तो यांना 5 टक्के मतं मिळाली. ही टक्केवारी ज्यांच्या नावासमोर हो असं क्लिक करण्यात आलं त्यावरून काढण्यात आली आहे.
मोदींव्यतिरिक्त ज्या व्यक्तिंना एकही मत मिळालं नाही त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव सीन स्पायसर, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प आणि तिच् पती जारेड कुशनेर यांचा समावेश आहे.
2016 मध्येही मोदींचं नाव रिडर्स पोलमध्ये होतं याशिवाय 2015 मध्येही मोदींचं नाव होतं.