OROPबाबत मोदींकडून धुळफेक - राहुल गांधी

By admin | Published: November 4, 2016 04:19 PM2016-11-04T16:19:04+5:302016-11-04T19:38:40+5:30

वन रँक वन पेन्शनवरून मोदी सरकारकडून लष्कराच्या जवानांची फसवणूक सुरू असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला.

Modi blamed for OROP - Rahul Gandhi | OROPबाबत मोदींकडून धुळफेक - राहुल गांधी

OROPबाबत मोदींकडून धुळफेक - राहुल गांधी

Next
ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 4 -  वन रँक वन पेन्शनवरून मोदी सरकारकडून लष्कराच्या जवानांची फसवणूक सुरू असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. 
वन रँक वन पेन्शनबाबत माजी सैनिकांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले,"मी आताच माजी सैनिकांची भेट घेतली. यावेळी हा पैशांचा नाही तर  न्यायाचा प्रश्न आहे, असे माजी माजी सैनिक म्हणाले. सरकारने वन रँक वन पेन्शन दिल्याचा दावा करत केवळ सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ केली. पण वन रँक वन पेन्शन लागू केलेली नाही. ही माजी सैनिकांच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे.  त्यामुळे पंतप्रधानांनी या मुद्यावरून खोटे बोलणे बंद केले पाहिजे."
माजी सैनिकांकडून वन रँक वन पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचाही राहुल यांनी उल्लेख केला. "गेल्या 509 दिवसांपासून माजी सैनिक जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. कारण सरकारने वन रँक वन पेन्शन लागू केलेली नाही. या मुद्यावर आपण काहीच करू शकत नाही, असे सरकार सैनिकांना सांगत आहे," असे राहुल म्हणाले. 
न्यायाची मागणी करत आत्महत्या करणाऱ्या माजी सैनिकाच्या कुटुंबीयांना फरफटत नेऊन ताब्यात घेतले जाते. हे अयोग्य आहे. सरकारने याबाबत माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.  
वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावरून माजी सैनिक राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केल्यापासून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, काँग्रेस आणि आपसह विरोधी पक्षांनी वन रँक वन पेन्शनवरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. 
दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सरकारने वन रँक वन पेन्शनसाठी निधी दिल्याचे सांगितले. तसेच काही लोक वन रँक वन पेन्शनवरून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जेटली यांनी केला.
 

Web Title: Modi blamed for OROP - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.