250 रुपये देऊन मोदींनी रॅलीला माणसे आणली- मायावती
By admin | Published: November 14, 2016 05:41 PM2016-11-14T17:41:45+5:302016-11-14T17:41:45+5:30
रॅलीसाठी आणलेल्या माणसांना प्रत्येकी 250 रुपये देण्यात आले होते, असा गंभीर आरोप मायावती यांनी केला आहे.
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 14 - बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. भाजपच्या गाझीपूर रॅलीमध्ये मोदींनी बिहारहून माणसं बोलावली होती. तसेच रॅलीसाठी आणलेल्या माणसांना प्रत्येकी 250 रुपये देण्यात आले होते, असा गंभीर आरोप मायावती यांनी केला आहे. त्या लखनऊमध्ये बोलत होत्या.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींची गाझीपूरमधली रॅली पूर्णतः फ्लॉप ठरली आहे. मोदींच्या या रॅलीमध्ये गर्दी असल्याचं वेगळे फोटो दाखवून भासवण्यात आलं. रॅलीसाठी बस आणि ट्रेनचा प्रवास मोफत करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेत राजकारण करत असल्याचाही आरोप मायावतींनी केला आहे.
दरम्यान, नोटबंदीच्या निर्णयामुळे वयोवृद्ध, महिला आणि रुग्णांना रांगेत उभे राहावे लागते आहे. त्यामुळे जनतेला सामूहिक त्रास होतो आहे. नोटबंदीच्या निर्णयाचं मायावतींनी स्वागत करताना याची केंद्र सरकारनं पूर्वतयारी करायला हवी होती, असं म्हटलं आहे. या नोटा जनतेपर्यंत पोहोचत नसल्यानं देशात बंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Modi ji makes claims of fighting against corruption, but today BJP got its volunteers in trains without tickets for Ghazipur rally: Mayawati pic.twitter.com/Oc7BoA3rmK
— ANI UP (@ANINewsUP) November 14, 2016