मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, धान्यासह 14 पिकांची MSP वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 05:10 PM2019-07-03T17:10:08+5:302019-07-03T17:10:20+5:30
अर्थसंकल्पाच्या पूर्वीच मोदी सरकारनं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.
नवी दिल्लीः अर्थसंकल्पाच्या पूर्वीच मोदी सरकारनं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळानं किमान आधार मूल्य (MSP) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. धान्याची प्रति क्विंटल MSP 85 रुपयांनी वाढवली आहे. आता मका, बाजरी, शेंगदाणा, तुरीच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये मोदी सरकारनं 10 वर्षांतली किमान आधार मूल्यात सर्वात मोठी वाढ केली होती. सोयाबिनच्या किमतीतही 311 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. तर सूरजमुखीच्या किमतीत 262 रुपये क्विंटलची वाढ केली गेली आहे. तूरडाळीच्या किमतीत 125 रुपये प्रतिक्विंटल, उडिद डाळीच्या किमतीत 100 रुपये प्रतिक्विंटलची वाढ केली आहे. तिळाची किंमत 236 रुपये प्रति क्विंटलनं वाढवली आहे. गेल्या अनेक काळापासून शेतकरी एमएसपीमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत. शेतकऱ्यांना आधार मूल्यात कमीत कमी दीड पट फायदा मिळाला पाहिजे, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
I thank PM @narendramodi ji for keeping promise with farmers & tackling farm distress by increasing paddy & cotton #MSP by Rs 65 & Rs 105 per quintal.This is in line with NDA resolve to ensure 50% profit on input costs. Hike will help fulfill PM goal to double farm income by 2022
— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) July 3, 2019
शेतकऱ्यांच्या मालावरचा नफा हा शेष घटक असतो. तो मागणी-पुरवठा, चढ-उताराचा बदलत्या आलेखावर ठरत असतो. ठरलेल्या किमतीला मिळणारा नफा बदलत असतो. ठरणारी किमत मागणी-पुरवठा घटकावर ठरते. मागणी, उत्पन्न पातळी व वाटणी तसेच आवडी-निवडीवर ठरते. पुरवठा उत्पादन खर्चावर व उत्पादन पद्धतीवर ठरतो. अशा व्यवस्थेत नफ्याचे 50 टक्के प्रमाण लक्षात घेऊन किमान आधार किमती ठरविणे शक्य असले तरी ते योग्य नसतेही. नफा मूलत: धोका व चिंता पत्करण्याचे फलित असते.