शिवसेनेनंतर आम्हीच! भाजपच्या छोट्या भावानं मागितला सत्तेत वाटा; लवकरच मोठा निर्णय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 11:54 AM2021-06-14T11:54:14+5:302021-06-14T11:58:09+5:30

भाजपच्या मित्रपक्षाला हवाय सत्तेत वाटा; लवकरच मोदी सरकारचा विस्तार अपेक्षित

Modi Cabinet Expansion jdu wants respectable share in union government | शिवसेनेनंतर आम्हीच! भाजपच्या छोट्या भावानं मागितला सत्तेत वाटा; लवकरच मोठा निर्णय होणार?

शिवसेनेनंतर आम्हीच! भाजपच्या छोट्या भावानं मागितला सत्तेत वाटा; लवकरच मोठा निर्णय होणार?

googlenewsNext

पाटणा: जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या मित्रपक्षांना संधी दिली जाऊ शकते. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलानं भाजपसोबतची मैत्री तोडत एनडीएच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता बाकीच्या मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून मोदींच्या मंत्रिमंडळात मित्र पक्षांना मानाचं स्थान दिलं जाऊ शकतं.

बिहारमध्ये एनडीएचा भाग असलेल्या संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी मंत्रिमंडळात सन्मानजनक हिस्सा देण्याची मागणी केली आहे. 'मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच अपेक्षित आहे. त्यात एनडीएच्या सर्व घटक पक्षांना जागा मिळायला हवी. सत्तेत केवळ नावाला वाटा नको, तर तो सन्मानजक असायला हवा,' असं सिंह म्हणाले. 

भाजपला मोठा भाऊ करणारा 'मोदींचा हनुमान' सापडला संकटात; छोटा भाऊ ५ खासदार फोडणार?

२०१९ मध्ये भाजपला प्रचंड यश मिळालं. मात्र त्यावेळी जेडीयूनं सत्तेत सहभागी होण्यास नकार दिला. त्यावेळी नितीश कुमार जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मंत्रिमंडळात केवळ एकच पद मिळत असल्यानं त्यांनी सरकारमध्ये सामील होण्यास नकार दिला. त्यावेळी मंत्रिपदासाठी राज्यसभा खासदार रामचंद्र प्रसाद सिंह आणि राजीव रंजन सिंह यांची नावं आघाडीवर होती. आता रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडेच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद असून जेडीयूनं सत्तेत वाटा मागितला आहे.

पासवानांच्या पक्षात उभी फूट, स्वकीयांनीच केला चिराग यांचा गेम, जाणून घ्या कोण आहेत पशुपती पारस

शिवसेनेनं २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्यानं आता जेडीयू एनडीएमधील भाजपचा प्रमुख साथीदार आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ उमेदवार निवडून आले. तर जेडीयूचे १६ उमेदवार विजयी झाले.

Web Title: Modi Cabinet Expansion jdu wants respectable share in union government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.