मोदी ‘प्रचारक’ अन् केजरीवाल ‘धरणेबाज’
By admin | Published: February 2, 2015 01:37 AM2015-02-02T01:37:46+5:302015-02-02T08:54:24+5:30
दिल्लीच्या प्रचारात सध्या एक ‘प्रचारक’ (मोदी) आहे अन् दुसरे ‘धरणेबाज’ (केजरीवाल) उतरले आहेत़ केवळ बाता मारणा-या
नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रचारात सध्या एक ‘प्रचारक’ (मोदी) आहे अन् दुसरे ‘धरणेबाज’ (केजरीवाल) उतरले आहेत़ केवळ बाता मारणा-या अशा लोकांपासून दिल्लीकरांनी सावध राहावे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आप संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर सोनियांनी सडकून टीका केली़
बदरपूरनजीकच्या मिठापूर येथील आपल्या पहिल्या निवडणूक सभेत त्या बोलत होत्या़ एका पक्षाकडे केवळ ‘प्रचारक’ आहे़ जो केवळ ‘प्रचार’ करतो़ दुसऱ्या पक्षाजवळ केवळ ‘धरणेबाज’ आहे, जो केवळ धरणे देण्यात व्यग्र असतो़ दिल्लीला सुशासन हवे आहे़ खोटी आश्वासने, खोट्या बाता अशांची दिल्लीला मुळीच गरज नाही़ भाजप आणि आप केवळ मोठ्या-मोठ्या बाता करू शकतात़ दिल्लीकरांनी अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे़ कारण देश केवळ नारेबाजीने चालत नाही, असे सोनिया म्हणाल्या़