काश्मीरच्या मुद्द्यावर मोदी का नाही बोलत, आझाद यांचा मोदींना सवाल
By Admin | Published: August 10, 2016 06:19 PM2016-08-10T18:19:47+5:302016-08-10T18:19:47+5:30
काश्मीरमधल्या वर्तमान स्थितीवर मोदी बोलत नसल्याची त्यांनी टीका केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अनेकदा महत्त्वाच्या विषयांवरही मोदी संसदेत बोलताना दिसत आहेत. मात्र काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदींवर हल्ला चढवला आहे. काश्मीरमधल्या सध्याच्या स्थितीवर मोदी बोलत नसल्याची त्यांनी टीका केली आहे. काश्मीरमधली परिस्थिती सामान्य नसून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, असं म्हणत गुलाम नबी आझाद यांना लक्ष्य केले आहे. या उपरोधिक बोलण्यातून गुलाम नबी आझाद यांनी भाजप आणि पर्यायानं नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून एक प्रतिनिधींचं मंडळ तिकडे पाठवण्याची मागणी केली आहे.
पुढे ते म्हणाले, नरेंद्र मोदी दररोज सकाळी 10 वाजता संसदेत येतात, स्वतःच्या कक्षात जातात आणि संध्याकाळी 6 वाजता कक्षातून निघून जातात. एवढा वेळ कोणत्या तरी मंत्र्यानं क्वचित संसदेला दिला असेल. मात्र संसदेत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच काश्मीरच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. दलितांवरील पंतप्रधान मोदींचं वक्तव्यही दलितांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी मोदींवर प्रखर टीका केली आहे. मोदी फक्त माणुसकीच्या मोठ्या मोठ्या बाता मारतात. त्यांना काश्मीरच्या मुद्द्यावर काही एक संवेदना नसल्याचं म्हणत मोदींवर टीका केली आहे.