मोदींनी गोमातेला चारा खाऊ घातला... आपल्या खांद्यावरील शाल मुलीला देत केले कौतुक...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 07:15 AM2024-01-15T07:15:29+5:302024-01-15T07:15:35+5:30

पंतप्रधान मोदींनी गर्दीत उभ्या असलेल्या लहान मुलींचीही भेट घेतली. यावेळी एका मुलीने कार्यक्रमादरमान सत्यम् शिवम् सुंदरम् हे गीत गात पंतप्रधान मोदींसह इतरांना मंत्रमुग्ध केले.

Modi fed fodder to the cow... gave the shawl on his shoulder to the girl and praised him... | मोदींनी गोमातेला चारा खाऊ घातला... आपल्या खांद्यावरील शाल मुलीला देत केले कौतुक...

मोदींनी गोमातेला चारा खाऊ घातला... आपल्या खांद्यावरील शाल मुलीला देत केले कौतुक...

देशाच्या दक्षिण राज्यांमध्ये रविवारी मोठ्या उत्साहात पोंगल सण साजरा करण्यात आला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्वतःच्या हाताने गायींना चारा भरवला आणि गाईंसोबत थोडा वेळ घालवला. यावेळी त्यांनी गाईंना लाडाने थोपटलेही. यानंतर ते दिल्लीत केंद्र सरकारमधील मंत्री एल. मुर्गन यांच्या घरी पोहोचले. तेथे उपस्थित लोकांना भेटले आणि सर्वांना पोंगलच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पंतप्रधान मोदींनी गर्दीत उभ्या असलेल्या लहान मुलींचीही भेट घेतली. यावेळी एका मुलीने कार्यक्रमादरमान सत्यम् शिवम् सुंदरम् हे गीत गात पंतप्रधान मोदींसह इतरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पंतप्रधानांनी टाळ्या वाजवून तिला दाद दिली. त्यानंतर त्यांनी मुलीला आपल्याजवळ बोलवत तिचे कौतुक केले आणि आपल्या खांद्यावरील शाल काढून तिच्या गळ्यात घातली. यानंतर तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. या सन्मानामुळे मुलीला प्रचंड आनंद झाल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Web Title: Modi fed fodder to the cow... gave the shawl on his shoulder to the girl and praised him...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.