शब्दांपेक्षा कृती महत्वाची हे मोदी विसरले - मनमोहन सिंग
By admin | Published: April 6, 2016 08:41 PM2016-04-06T20:41:34+5:302016-04-06T20:51:36+5:30
शब्दांपेक्षा कृतीला महत्व असते हे मोदी विसरले आहेत अशा शब्दात माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
Next
ऑनलाइन लोकमत
गुवहाटी, दि. ६ - शब्दांपेक्षा कृती जास्त बोलते, पंतप्रधान नरेंद्र मोदींना या म्हणीचा विसर पडला आहे. शब्दांपेक्षा कृतीला महत्व असते हे मोदी विसरले आहेत अशा शब्दात माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. आसाममधील गुवहाटीमधील सभेमध्ये ते बोलते होते. मनमोहन सिंग आसाममधूनच राज्यसभेवर खासदार आहेत.
शांत, संयमी स्वभावाचे मनमोहन सिंग दहावर्षांच्या सत्ता काळाता फारसे बोलले नाहीत. मोदी याउलट आहेत. मोदी सतत जनतेशी संवाद साधत असतात. मनमोहन सिंग यांच्या मौन बाळगण्यावरुनच भाजपने त्यांना विरोधी पक्षात असताना वारंवार लक्ष्य केले होते.
मनमोहन सिंग यांनी मोदींना त्यांच्या परदेश दौ-यावरुन लक्ष्य केले. मोदींच्या परदेश दौ-याला भाजपकडून मोठी कामगिरी म्हणून दाखवले जातात. पण प्रत्यक्षात या दौ-यातून काहीही निकाल मिळालेले नाहीत असे सिंग म्हणाले. आपले पाकिस्तानबद्दलचे धोरणही अपयशी ठरले आहे अशी टीका सिंग यांनी केली.
निवडणूक प्रचारात मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मनमोहन सिंग यांनी आपल्या भाषणात तो मुद्दाही उपस्थित केला. प्रत्यक्षात मोदी सरकार जनतेला दिलेली मोठमोठी आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. आसाममध्ये ४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आता ११ एप्रिलला दुस-या टप्प्याचे मतदान होणार आहे.