...म्हणून भाजपा कोरोना संकट काळात ७५० व्हर्च्युअल रॅली काढणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 07:33 AM2020-05-26T07:33:42+5:302020-05-26T07:43:35+5:30

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे भाषण फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. तसेच, याचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितले आहे. प्रत्येक बूथला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

Modi Government 2.0 Bjp Organized 750 Virtual Rallies rkp | ...म्हणून भाजपा कोरोना संकट काळात ७५० व्हर्च्युअल रॅली काढणार! 

...म्हणून भाजपा कोरोना संकट काळात ७५० व्हर्च्युअल रॅली काढणार! 

Next
ठळक मुद्देभाजपा १००० व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे.मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळाचे पहिले वर्ष 30 मे रोजी पूर्ण करत आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण करणार आहे. सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे. यातच भाजपाने मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होणार, या निमित्ताने विविध तयारी केली आहे. यासाठी भाजपा १००० व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे.

भाजपाद्वारे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निर्देशनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प, जागतिक कल्याणासाठी भारताची भूमिका आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता आणि निरोगी राहण्यासाठी चांगल्या सवयींचा निर्धार करण्याच्या आवाहानाला देशभरातील १० कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचविले जाईल.

मोदी सरकार-२ चे एक पूर्ण झाल्यानंतर भाजपाने सोशल डिस्टंसिंग आणि एमएचएच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 1000 व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्ससमवेत 750 व्हर्च्युअल रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान, पार्टीचे कार्यकर्ते आपापल्या विभागात फेस कव्हर आणि सॅनिटायझरचे वाटप करतील.

NBT

भाजपाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निर्देशनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे लिहिलेले पत्र, ज्यामध्ये आत्मनिर्भर भारताचा संकल्प, जागतिक कल्याणासाठी भारताची भूमिका आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता आणि निरोगी राहण्यासाठी चांगल्या सवयींचा निर्धार करण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहनाला देशभरातील १० कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचविले पाहिजे. यासाठी हे पत्र वाटताना कार्यकर्त्यांनी फक्त दोघांच्या समुहात राहावे आणि कंटेनमेंट झोन, क्वारंटाईन सेंटर आणि सार्वजनिक जागांपासून सुरक्षित राहाण्यास सांगितले आहे.

NBT

याचबरोबर, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे भाषण फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. तसेच, याचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितले आहे. प्रत्येक बूथला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, कोरोनाच्या बचावासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांशी संबंधित एक लहान व्हिडिओ देखील पार्टीकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. दरम्यान, मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळाचे पहिले वर्ष 30 मे रोजी पूर्ण करत आहे.

Web Title: Modi Government 2.0 Bjp Organized 750 Virtual Rallies rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.