मोदी सरकारने जनतेवरच केला सर्जिकल स्ट्राइक, जिग्नेश मेवाणींचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 02:20 AM2018-07-04T02:20:30+5:302018-07-04T02:20:57+5:30
पंतप्रधान मोदी यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन न पाळता, नोटाबंदी केल्याने आणि जीएसटी लागू करून देशातील १२५ कोटी जनतेवरच जीवघेणा सर्जिकल स्ट्राइक केल्याचा आरोप गुजरातचे आमदार व दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी केला.
अहमदाबाद : पंतप्रधान मोदी यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन न पाळता, नोटाबंदी केल्याने आणि जीएसटी लागू करून देशातील १२५ कोटी जनतेवरच जीवघेणा सर्जिकल स्ट्राइक केल्याचा आरोप गुजरातचे आमदार व दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी केला.
सप्टेंबर २0१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ मध्यंतरी प्रसारित करण्यात आला. त्यावर याचा फायदा उठवण्याचा मोदी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, बेरोजगारांसाठी रोजगारांची निर्मिती करू, अशी आश्वासने मोदी यांनी प्रचारात दिली होती. मेवाणी यांनी यापैकी एकही आश्वासन सरकारने पाळले नसल्याची टीका केली. (वृत्तसंस्था)