Modi Cabinet Full List: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? जाणून घ्या एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 10:39 PM2021-07-07T22:39:30+5:302021-07-07T22:43:28+5:30

Portfolio Of New Ministers: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे.

modi government announced portfolio of new ministers after cabinet expansion check full list | Modi Cabinet Full List: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? जाणून घ्या एका क्लिकवर...

Modi Cabinet Full List: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? जाणून घ्या एका क्लिकवर...

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला. यात २८ राज्यमंत्री आणि १५ कॅबिनेट मंत्र्यांसह एकूण ४३ नव्या मंत्र्यांनी मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. आता खातेवाटप देखील जाहीर झालं आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी स्वत:जवळ ठेवली आहे. तर नव्यानं तयार करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे असणार आहे. 

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नेमकं कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं देण्यात आलंय? जाणून घेऊयात...

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी- विज्ञान तंत्रज्ञान विभाग
  • अमित शहा- सहकार मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
  • मनसुख मांडवीय- केंद्रीय आरोग्य मंत्रालय, खते-रसायन मंत्रालय
  • अश्विनी वैष्णव- केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि आयटी व कम्युनिकेशन मंत्रालय
  • धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री, कौशल्य विकास मंत्रिपद
  • पियूष गोयल- वस्त्रोद्योग मंत्रालय आणि ग्राहक कल्याण मंत्रालयासोबतच वाणिज्य मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
  • हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्रायल, नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय
  • अनुराग ठाकूर- माहिती व प्रसारण मंत्रालय, यासोबतच युवा मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
  • ज्योतिरादित्य शिंदे- नागरी उड्डाण मंत्री
  • नायारण राणे- सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय (MSME मंत्रालय)
  • सर्बानंद सोनोवाल- पोर्ट, शिपिंग आणि वॉटरवेज मंत्रालय, आयुष मंत्रालय
  • मुख्तार अब्बास नक्वी- केंद्रीय अल्पसख्यांक मंत्रालय
  • डॉ. वीरेंद्र कुमार- सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
  • रामचंद्र प्रसाद सिंग- स्टील मंत्रालय
  • स्मृती इराणी- आता केवळ बालविकास मंत्रालय
  • भुपेंद्र यादव- श्रम मंत्रालय
  • आर.के.सिंह- केंद्रीय कायदे मंत्री
  • गिरीराज सिंह- ग्रामविकास मंत्रालय
  • किरन रिजीजू- सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री
  • पशुपती पारस- अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
  • महेंद्र नाथ पाण्डेय - अवजड उद्योग मंत्री 
  • पुरूषोत्तम रुपाला- मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्री

  • जी.किशन रेड्डी- सांस्कृतिक व पर्यटन मंत्री आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री

    राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

    १. राव इंद्रजीत सिंह- सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), योजना मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि कॉर्पोरेट मंत्रालय राज्यमंत्री

    २. डॉ. जितेंद्र सिंह- विज्ञान आणि प्राद्योगिकी मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)


    राज्यमंत्री

    १. श्रीपाद येसो नाईक- पोर्ट, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रायल राज्यमंत्री, यासोबतच पर्यटन राज्यमंत्री
    २. फग्गनसिंग कुलस्ते- इस्पात मंत्रालय राज्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्रालय राज्यमंत्री
    ३. प्रल्हादसिंह पटेल- जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री
    ४. अश्विनी कुमार चौबे- उपभोक्ता, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय राज्यमंत्री, यासोबतच पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय राज्यमंत्री
    ५. अर्जुन राम मेघवाल- संसदीय कार्यमंत्री राज्यमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री
    ६. व्ही.के.सिंह- रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय राज्यमंत्री, नागरी उड्डाण मंत्रालय राज्यमंत्री
    ७. कृष्णपाल- विद्युत मंत्रालय राज्यमंत्री, अवजड उद्योग राज्यमंत्री
    ८. रावसाहेब दानवे- रेल्वे मंत्रालय राज्यमंत्री, कोळसा मंत्रालय राज्यमंत्री आणि अन्न मंत्रालय राज्यमंत्री
    ९. रामदास आठवले- सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री
    १०. साध्वी निरंजन ज्योती- उपभोक्त, खाद्य आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्रालाय राज्यमंत्री
    ११. डॉ. संजीव कुमार बाल्यान- मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअर मंत्रालय राज्यमंत्री
    १२. नित्यानंद राय- गृहमंत्रालय राज्यमंत्री
    १३. पंकज चौधरी- अर्थमंत्रालय राज्यमंत्री
    १४. अनुप्रिया सिंह पटेल- वाणिज्य मंत्रालय राज्यमंत्री
    १५. एस.पी.सिंह बघेल- कायदा आणि न्याय मंत्रालय राज्यमंत्री
    १६. राजीव चंद्रशेखर- कौशल्य विकास राज्यमंत्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्राद्योगिकी मंत्रालय राज्यमंत्री
    १७. शोभा करंदलाजे- कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय राज्यमंत्री
    १८. भानु प्रताप सिंह वर्मा- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय राज्यमंत्री
    १९. दर्शन विक्रम जरदोश- वस्त्रोद्योग राज्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्री
    २०. व्ही. मुरलीधरन- परराष्ट राज्यमंत्री, संसदीय कामकाज राज्यमंत्री
    २१. मिनाक्षी लेखी- परराष्ट्र राज्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रालय राज्यमंत्री
    २२. सोम प्रकाश- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय राज्यमंत्री
    २३. रेणुका सिंह सरुता- जनजाती प्रकरणांमध्ये राज्यमंत्री
    २४. रामेश्वर तेली- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय राज्यमंत्री आणि श्रम कल्याण व रोजगार मंत्रालय राज्यमंत्री
    २५. कैलाश चौधरी- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय राज्यमंत्री
    २६. अन्नपूर्णा देवी- शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री
    २७. ए.नारायणस्वामी- सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालय राज्यमंत्री
    २८. कौशल किशोर- आवास आणि शहरी प्रकरणं मंत्रालय राज्यमंत्री
    २९. अजय भट्ट- संरक्षण मंत्रालय राज्यमंत्री आणि पर्यटन विकास राज्यमंत्री
    ३०. बी.एल.वर्मा- उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्रालय राज्यमंत्री
    ३१. देवुसिंह चौहान- संचार मंत्रालय राज्यमंत्री
    ३२. अजय कुमार- गृहमंत्रालय राज्यमंत्री
    ३३. भगवंत खुबा- नवऊर्जा मंत्रालय राज्यमंत्री आणि रसायन मंत्रालय राज्यमंत्री
    ३४. कपिल पाटील- पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्री
    ३५. प्रतिमा भौमिक- सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालय राज्यमंत्री
    ३६. डॉ. सुभाष सरकार- शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री
    ३७. डॉ. भागवत कराड- अर्थ मंत्रालय राज्यमंत्री
    ३८. डॉ. राजकुमार रंजन सिंह- परराष्ट्र मंत्रालय राज्यमंत्री, शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री
    ३९. डॉ. भारती पवार- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्री
    ४०. बिश्वेश्वर टुडू- जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री
    ४१. शांतनु ठाकूर- बंदरं आणि जल मंत्रालय राज्यमंत्री
    ४२. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई- महिला आणि बालकल्याण मंत्रालय राज्यमंत्री, आयुष मंत्रालय राज्यमंत्री
    ४३. जॉन बारला- अल्पसंख्यांक मंत्रालय राज्यमंत्री
    ४४. डॉ. एल. मुरुगन- मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालय राज्यमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री
    ४५. निसिथ प्रमाणिक- गृह मंत्रालय राज्यमंत्री, क्रीडा मंत्रालय राज्यमंत्री

Web Title: modi government announced portfolio of new ministers after cabinet expansion check full list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.