मोदी सरकारने मध्यमवर्गावर चढविला हल्ला

By admin | Published: March 20, 2016 04:25 AM2016-03-20T04:25:00+5:302016-03-20T04:25:00+5:30

अल्पबचतीवर मिळणाऱ्या व्याजात घट करून केंद्रातील मोदी सरकारने मध्यमवर्गावर आणखी एक हल्ला केला असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी

Modi government attacks on middle class attack | मोदी सरकारने मध्यमवर्गावर चढविला हल्ला

मोदी सरकारने मध्यमवर्गावर चढविला हल्ला

Next

- अल्पबचतीवरून राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : अल्पबचतीवर मिळणाऱ्या व्याजात घट करून केंद्रातील मोदी सरकारने मध्यमवर्गावर आणखी एक हल्ला केला असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली आहे.
हे सरकार आतापर्यंत शेतकरीविरोधी धोरणे आखून, त्याची अंमलबजावणी करीत आले आहे. गरिबांना सोयी-सवलती देण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले
आहे; आणि आता सरकारने मध्यमवर्गाच्या अल्पबचतीवरील व्याजात घट करून
या नोकरदारांवरही हल्ला चढवला
आहे, असे ते म्हणाले.
किसान विकास पत्र आणि पीपीएफ हा कायमच नोकरदार मध्यमवर्गाचा अल्पबचतीचा मार्ग राहिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना तर त्यावर काहीसे व्याजही जादा दिले जाते. पण आता मोदी सरकारने समाजातील या घटकांनाही त्रास देण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Web Title: Modi government attacks on middle class attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.