मोदी सरकारलाच माहीत नाही देशात विदेशी घुसखोर किती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 03:35 AM2020-02-06T03:35:58+5:302020-02-06T03:36:16+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेळोवेळी बेकायदेशीररित्या भारतात राहात असलेल्या विदेशी नागरिकांकडून देशाच्या संसाधनांचा कसाउपभोग घेतला जात आहे, असे सांगतात.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेळोवेळी बेकायदेशीररित्या भारतात राहात असलेल्या विदेशी नागरिकांकडून देशाच्या संसाधनांचा कसाउपभोग घेतला जात आहे, असे सांगतात. परंतु, प्रत्यक्षात सरकारकडेच या घुसखोरांच्या संख्येची माहिती नाही. कोणतीही वैध कागदपत्रे नसतानाही विदेशी नागरिक देशात येतात हे सरकारलाही मान्य आहे.
गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांचे म्हणणे असे आहे की, वैध दस्तावेज नसतानाही भारतात राहत असलेल्या बांगलादेशीयांसह इतर देशांतील विदेशी नागरिकांचा पत्ता शोधून त्यांना परत पाठवण्याची ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ते अवैध रु पाने भारतात शिरतात त्यामुळे त्यांची नेमकी संख्या गोळा करणे अवघड आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात राय यांनी राज्यसभेत सांगितले की, वैध दस्तावेज घेऊन आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही हजारों बांगलादेशी नागरिक भारतात राहात आहेत. २०१७ मध्ये ही संख्या २५,९४२, २०१८ मध्ये ४९,६४५ आणि २०१९ मध्ये ३५,०५५ होती. डॉ. अनिल अग्रवाल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राय म्हणाले की, २०१७ पासून जानेवारी २०२० पर्यंत एकूण ३७२७ बांगलादेशी नागरिकांना घुसखोरी करताना पकडले गेले. त्यांना बांगलादेशच्या अधिकाऱ्यांच्या त्याब्यात दिले गेले. यात सगळ््यात जास्त १३५१ जणांना २०१९ मध्ये पकडले गेले. सर्वात जास्त लोक पश्चिम बंगाल सीमेवर घुसखोरी करताना पकडले गेले.
निर्वासित केल्या गेलेल्या विदेशी नागरिकांच्या प्रश्नावर राय यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये एकूण ५५८३ विदेशी नागरिकांना निर्वासित केले गेले. त्यात सर्वात जास्त २२३६ लोक नायजेरिया आणि ७९५ बांगलादेशचे होते.