परराष्ट्र आघाडीवर मोदी सरकार ‘फेल’

By admin | Published: July 18, 2015 03:23 AM2015-07-18T03:23:32+5:302015-07-18T03:23:32+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे त्यांचे समपदस्थ नवाज शरीफ यांच्यादरम्यान रशियाच्या उफामध्ये झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानचा पवित्रा बघून परराष्ट्र धोरणाच्या

Modi government 'fail' on foreign front | परराष्ट्र आघाडीवर मोदी सरकार ‘फेल’

परराष्ट्र आघाडीवर मोदी सरकार ‘फेल’

Next

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे त्यांचे समपदस्थ नवाज शरीफ यांच्यादरम्यान रशियाच्या उफामध्ये झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानचा पवित्रा बघून परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याच्या निष्कर्षाप्रत काँग्रेस पोहोचली आहे.
माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी या मुद्यावर मोदी सरकारवर प्रहार करताना निव्वळ पोलिसांच्या दंडुकेशाहीने परराष्ट्र धोरण राबविता येत नाही, असा टोमणा मारला. त्यांचा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याकडे होता. डोवल हे सध्या परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत मोदींचा डोळा आणि कान झाले आहेत. खुर्शीद यांनी यापूर्वीचे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि मोदी सरकारने पाकिस्तानसंदर्भात अवलंबलेल्या धोरणाचाही तुलनात्मक आढावा घेतला. ते म्हणाले की, संपुआ शासनकाळात जागतिक पार्श्वभूमी लक्षात घेता पाकिस्तानसोबत चर्चेची गरज वेळोवेळी व्यक्त करण्यात आली. परंतु आम्ही डोळे आणि कान नेहमी उघडे ठेवले. त्यावेळी विरोधकांच्या भूमिकेत असलेली भाजपा मात्र याचा विरोध करीत होती. एकीकडे मोदी आणि शरीफ हातमिळवणी करीत असताना पाक मात्र अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत आहे. असे यापूर्वी कधी घडले का? पाकने भारताचा नेहमीच विश्वासघात केला आहे. हे चांगल्या पद्धतीने माहीत असूनही सरकारने डोळे बंद केले आहे. उफामध्ये मोदी-शरीफ बैठकीनंतर सीमेवर सतत गोळीबार सुरू आहे. मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून आतापर्यत पाकने ८०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. चर्चेनंतर १८ नागरिक आणि १२ जवान शहीद झाले, याकडेही खुर्शीद यांनी लक्ष वेधले.


चीनला ओळखण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. चीनने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाच्या मुद्यावर पाकचे समर्थन केले. आम्हाला हे का समजू शकले नाही. आफ्रिकेला महत्त्व न देण्याची चूक हे सरकार करीत आहे. जेथून पैसा मिळेल त्यांच्यासोबतच जायला पाहिजे,असे या सरकारचे मत आहे. परंतु ही भूमिका योग्य नाही.

पाकिस्तानसोबत अवश्य चर्चा करा. परंतु भूतकाळातील अनुभवांचेही स्मरण ठेवा. कारगील का,केव्हा आणि कसे झाले. डोळे आणि कान उघडे ठेवण्याची गरज आहे. चर्चेसाठी निश्चित डावपेच असले पाहिजेत,असा सल्लाही त्यांनी मोदींना दिला. मोदींच्या परराष्ट्र धोरणाच्या आधारे आम्हाला जास्त दूरचा पल्ला गाठता येणार नाही,असेही स्पष्ट केले.

चीनला ओळखण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. चीनने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाच्या मुद्यावर पाकचे समर्थन केले. आम्हाला हे का समजू शकले नाही. पंतप्रधान ज्या पद्धतीने स्वत:चे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याने काही फायदा होणार नाही, अशी तोफ खुर्शीद यांनी डागली. पाकिस्तानसोबत अवश्य चर्चा करा. परंतु भूतकाळातील अनुभवांचेही स्मरण ठेवा, असा सल्लाही खुर्शीद यांनी मोदी यांना दिला.

Web Title: Modi government 'fail' on foreign front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.