मोदी सरकारने ६ वर्षात PM Kisan योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३.६८ लाख कोटी रुपये दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:27 IST2025-02-24T18:26:40+5:302025-02-24T18:27:57+5:30
PM Kisan Yojana : पीएम किसान योजना ही २०१९ मध्ये सुरू झाली होती, तेव्हापासून कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे.

मोदी सरकारने ६ वर्षात PM Kisan योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३.६८ लाख कोटी रुपये दिले
नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. यापैकी फक्त एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेचा १९ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जारी केला आहे. या योजनेंतर्गत देशातील नरेंद्र मोदी यांनी ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खातेदारांसाठी २२ कोटींचा रक्कम ट्रान्सफर केली आहे.
पीएम किसान योजना ही २०१९ मध्ये सुरू झाली होती, तेव्हापासून कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एकूण ६,००० रुपये ट्रान्सफर केले जातात. दरम्यान, आधी फक्त ९.६० कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता, परंतु आता लाभार्थ्यांची संख्या ९.८० कोटी झाली आहे. १९ व्या हप्त्यासह शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण ३.६८ लाख कोटी रुपये मिळाले आहेत.
योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पात्रता तपासणी
केंद्र सरकारकडून या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची पात्रता तपासणी केली जात आहे. कारण या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कठोर पाऊले उचलली जात आहेत.
लाभार्थी लिस्ट ऑनलाइन तपासू शकता
शेतकऱ्यांना पहिल्यांदा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल आणि होम पेजवर फार्मर कॉर्नरवर जावे लागेल. फार्मर कॉर्नरमध्ये लाभार्थी लिस्टच्या लिंकवर क्लिक करा. या प्रक्रियेनंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाची माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण लिस्ट येईल.
हेल्पलाइन क्रमांक
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी १५५२६१ वर कॉल करू शकता.