मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; अर्थमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत 

By कुणाल गवाणकर | Published: October 20, 2020 09:03 AM2020-10-20T09:03:35+5:302020-10-20T09:10:48+5:30

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसमोरील अडचणींमध्ये वाढ; मोदी सरकार लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता

modi government likely to bring another stimulus package indicates finance minister nirmala sitharaman | मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; अर्थमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत 

मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; अर्थमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत 

Next

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. कोरोनामुळे अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था अद्यापही रुळावर आलेली नाही. त्यामुळे आता लवकरच केंद्र सरकार तिसरं आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे आणखी एका आर्थिक पॅकेजचा पर्याय उपलब्ध असल्याचं सीतारामन म्हणाल्या. सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) नेमक्या कोणत्या कारणांमुळे घट झाली, त्याचं आकलन करण्यास सरकारनं सुरुवात केली आहे. यातून केंद्राला काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्याचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष आम्ही संसदेत किंवा लोकांसमोर मांडू, असं सीतारामन म्हणाल्या.

दसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरू

सरकारी कंपन्यांना खर्च वाढवण्याच्या स्पष्ट सूचना
सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या सरकारी कंपन्यांना खर्च वाढवण्याच्या सूचना अर्थमंत्री सीतारामन यांनी दिल्या आहेत. 'मोठ्या कंपन्यांना २०२०-२१ मध्ये योजनाबद्ध रितीनं भांडवली खर्चाच्या ७५ टक्के हिस्स्याच्या ७५ टक्के रक्कम डिसेंबर २०२० पर्यंत खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर झालेला नकारात्मक परिणाम दूर करण्यास मदत मिळेल,' असं सीतारामन यांनी सांगितलं.

सणासुदीला सर्वसामान्यांना दिलासा! डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता; मोदी सरकारचा मोठा निर्णय

सीतारामन यांनी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू यांच्याशी संबंधित मंत्रालयांच्या १४ कंपन्यांच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांची ऑनलाईन बैठक घेतली. भांडवली योजनांवर वेगानं काम करण्याच्या सूचना सीतारामन यांनी बैठकीत दिल्या. यावेळी सरकारी कंपन्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. सरकारी कंपन्यांनी खर्च वाढवल्यास अर्थव्यवस्थेला गती मिळेल. त्यामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये भांडवली खर्च वाढवण्याचं आवाहन अर्थमंत्र्यांनी केलं.

Read in English

Web Title: modi government likely to bring another stimulus package indicates finance minister nirmala sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.