आता मोदी सरकार 25 रुपये किलोने विकणार तांदूळ?; जाणून घ्या, कुठे करता येणार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 04:37 PM2023-12-27T16:37:18+5:302023-12-27T16:44:12+5:30

सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सरकारचं म्हणणं आहे.

modi government may sell bharat rice at discounted rate of rs 25 kg in country | आता मोदी सरकार 25 रुपये किलोने विकणार तांदूळ?; जाणून घ्या, कुठे करता येणार खरेदी

आता मोदी सरकार 25 रुपये किलोने विकणार तांदूळ?; जाणून घ्या, कुठे करता येणार खरेदी

पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि मोदी सरकार याच दरम्यान सातत्याने नवनवीन निर्णय घेत आहे. आता नववर्षाला सर्वसामान्यांना स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे. सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सरकारचं म्हणणं आहे. 25 रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येईल. यापूर्वी याच धर्तीवर केंद्र सरकार देशभरातील जनतेला पीठ आणि चणा डाळ उपलब्ध करून दिली आहे. भारत राइस (Bharat Rice) या नावाने तांदूळ दिला जाऊ शकतो.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही धान्याच्या किमती वाढल्या तर जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी योजना सरकारने नेहमीच आखली आहे. लाइव्ह मिंटच्या म्हणण्यानुसार, ही योजना सुरू केल्यास, राष्ट्रीय कृषी सहकारी मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED), नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) आणि केंद्रीय भंडार आउटलेट्स यांसारख्या सरकारी संस्थांना सवलतीच्या दराने तांदूळ विकला जाईल. मोबाईल व्हॅनद्वारे विक्री केली जाईल.

सरकारने हे पाऊल अशा वेळी उचललं आहे जेव्हा अन्नधान्य महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये 6.61 टक्के आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये 4.67 टक्क्यांच्या तुलनेत 8.7 टक्के होता. NSO च्या आकडेवारीनुसार याच कालावधीत धान्याच्या किमती 10.3 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढली

खाद्यपदार्थांच्या चढ्या किमतींमुळे नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई 5.55 टक्के होती. ऑक्टोबरमध्ये 4.87 टक्के होती. ऑगस्टमध्ये महागाईत घट झाली होती आणि त्यादरम्यान किरकोळ महागाई 6.83 टक्क्यांवर पोहोचली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर 5.88 टक्के होता.

पीठ आणि चणा दाळ

सध्या देशातील 2000 हून अधिक रिटेल पॉईंट्सवर केंद्र सरकार 27.50 रुपये प्रति किलो दराने 'भारत आटा' म्हणजेच पीठ आणि 60 रुपये प्रति किलो दराने चणा डाळ विकत आहे. गव्हाचं पीठ आणि चणा डाळ 2,000 हून अधिक केंद्रांवर विकली जात आहे.

Web Title: modi government may sell bharat rice at discounted rate of rs 25 kg in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.