मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; जागतिक बाजारपेठेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 02:46 PM2022-05-26T14:46:50+5:302022-05-26T14:47:08+5:30

महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्चस्तरावर हालचाली सुरू आहेत. खाद्यवस्तूंच्या दरावर लक्ष ठेवणाऱ्या समितीने प्रत्येक उत्पादनाबाबत बैठक घेतली आहे

Modi government ready to take decision on Ban export rice after wheat and sugar | मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; जागतिक बाजारपेठेत खळबळ

मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; जागतिक बाजारपेठेत खळबळ

Next

नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन युद्धाला आता ३ महिन्यांहून अधिक काळ उलटत आला त्यामुळे त्याचे परिणाम जगभरात होत असल्याचं दिसून येत आहे. जगात अन्न संकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशात घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या खाद्य वस्तू आवश्यक साठा नसल्याने निर्यातीवर बंदी आणली जात आहे. गहू, साखर निर्यातीवर भारताने बंदी आणली आहे. आता केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी (Rice Export Ban) आणण्याची तयारी करत असल्याचं सांगितले जात आहे.

पंतप्रधान कार्यालय घरगुती खाद्य वस्तूच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी पाऊल उचलत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ५ गरजेच्या वस्तू निर्यात करण्यावर रोख आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यातील यादीत गहू, साखरेच्या निर्यातीवर आधीच बंदी आणली आहे. आता येणाऱ्या काळात तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याचा विचार सुरू आहे. बासमती तांदूळ वगळता इतर तांदूळ निर्यात होणार नाहीत. गहू आणि साखरेप्रमाणेच तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे.

ईटी रिपोर्टनुसार, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्चस्तरावर हालचाली सुरू आहेत. खाद्यवस्तूंच्या दरावर लक्ष ठेवणाऱ्या समितीने प्रत्येक उत्पादनाबाबत बैठक घेतली आहे. दर नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावं लागेल यावर विचार विनिमय सुरू आहे. यात साखरेसोबत तांदूळ निर्यातबंदी आणली जाऊ शकते असं सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. सरकारने साखरेच्या निर्यातीवर २० लाख टन मर्यादा आखून दिली आहे.

तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार भारत

भारत जगातील तांदूळ निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तांदूळ निर्यातीत भारतापुढे चीन आहे. भारताने २०२१-२२ मध्ये १५० हून जास्त देशांना तांदूळ निर्यात केला आहे. त्यात भारताने विना बासमती तांदूळ निर्यातीवर सर्वात जास्त परदेशी चलन कमाई केली. बहुतांश देश धान्य निर्यातीबाबत इनवार्ड पॉलिसी अंमलात आणत आहेत. भारतही तेच करत आहे. आधी देशातंर्गत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. त्यानंतर तांदूळ निर्यात केले जाईल हे खरेच आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे.

Web Title: Modi government ready to take decision on Ban export rice after wheat and sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.